Take a fresh look at your lifestyle.

डाळिंब व टोमॅटो या पिकांवरील प्रशिक्षण वर्ग संपन्न

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभागांतर्गत फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) आयोजीत डाळिंब व टोमॅटो पिकांवरील किड व रोगांचे एकात्मिक नियंत्रण या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आला होता.

या प्रशिक्षण वर्गांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून 70 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये डॉ. संजय कोळसे, डॉ. अण्णासाहेब नवले, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. अनिकेत चंदनशिवे, प्रा. चिमाजी बाचकर व प्रा. सोमनाथ पवार यांनी डाळिंब तसेच टोमॅटो पिकांवरील किड व रोगांचे एकात्मिक नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. नंदलाल देशमुख यांनी प्रकल्पाचे महत्व, विस्तार व कार्याबद्दल प्रशिक्षणार्थींना माहिती दिली. यावेळी प्रशिक्षणार्थींना विद्यापीठाची कृषिदर्शनी, जैविक खते व डाळिंब व टोमॅटो पिकांवरील घडीपत्रिका यांचे वाटप करण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. तानाजी नरुटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन सदरचे प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या संपन्न केले. या प्रशिक्षण वर्गांचे संपूर्ण समालोचन हॉर्टसॅप प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. नंदलाल देशमुख यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.