Take a fresh look at your lifestyle.

बदलापुरात उद्धव ठाकरेंना दे धक्का! सर्वच नगरसेवक शिंदे गटात सामील

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

बदलापूर – शिंदे गटाच्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हयांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट निर्माण झाली आहे. त्यानंतर अनेक शिवसेना नेते, पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होत आहे. आता बदलापुरातील तब्बल २५ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे.

प्रताप सरनाईकांनी फोडले 10 नगरसेवक; शिंदे गटाच्या दाव्यावरून शिवसेना आक्रमक

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला धक्का देणाऱ्या घटना आज पुन्हा घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात पुण्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर बदलापूरमधील सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांनी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. हा मुख्य शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जातोय. ठाणे जिल्ह्यात तर जिथे बघाव तिथे शिंदे समर्थकच दिसत आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची पोकळी उद्धव ठाकरे कशी भरुन काढतील? हा मोठा सवाल आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले, ‘हे’ कारण येत आहे समोर

बदलापूरचे २५ नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी नंदनवन बंगल्यावर दाखल झाले.

तर ठाणे जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार , अंबरनाथ पंचायत समिती सभापती अनित निरगुडा, अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे हे दिग्गज राजकीय नेते शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंना आगामी निवडणुकीत मोठा फटका पडू शकतो.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.