Take a fresh look at your lifestyle.

माजी नगराध्यक्षा डॉ तनपुरे यांच्या हस्ते रास्ता कामाचे भूमिपूजन

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला हा रस्ता म्हणजे शहराचे प्रवेशद्वार असलेला व शहराच्या सौंदर्यात भर घालणारा रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख भविष्यात होणार आहे. ठेकेदारांनी रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करावे असे नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे यांनी आवाहन केले

राज्यमंत्री तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या केंद्रीय रस्ते निधी योजनेतील पाण्याची टाकी (नगर मनमाड रस्ता ते स्टेशन रोड ते मांजरी ) सुमारे 3 कोटी 45 लाख 89 हजार 218 रुपये किमतीच्या रस्त्याचे काम व सौंदर्यीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ माजी नगराध्यक्षा डॉ तनपुरे यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लबच्या रक्त पेढी जवळ संपन्न झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, हभप प्रभाकर महाराज म्हसे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष कोंडीराम वडीतके, वकील संघटनेचे अध्यक्ष राहुल शेटे, सूर्यभान म्हसे, बाळासाहेब उंडे, विठ्ठल विरकर, पटेल, अरुण विठ्ठल तनपुरे आदि उपस्थित होते.

डॉ तनपुरे आपल्या भाषणात म्हणाल्या तालुक्यातून नगर मनमाड रस्त्याला जोडणाऱ्या राहुरी ते मांजरी व्हाया स्टेशन रोड नाका नं 5 मार्गे जाणाऱ्या या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण व्हावे यासाठी मी नगराध्यक्ष व चंद्रभागाबाई गीताराम तनपुरे नगरसेविका असताना एकनाथ तनपुरे व आम्ही खूप दिवस प्रयत्नशील होतो. पण आज हा रस्ता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अगदी अल्पवधीत या रस्त्यास मंजुरी आणून रस्त्यासाठी 3 कोटी 45 लाख 89 हजार रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरण करण्याच्या कामात प्रत्यक्ष सुरुवात झाली रस्त्याचे काम जेव्हा सुरु झाले त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली अनेक जुनी झाडें तोडण्यात आल्याने हा भाग आज जरी भकास वाटत असला तरी भविष्यात रस्त्याच्याकडेला अधिक दहा पट झाडे लावण्यात येतील असा शब्द या कामाचे ठेकेदार आर एच दरे यांनी दिला असून ते लिंब, वड, पिंपळ आदि झाडें लावणार आहेत. ठेकेदारांनी रस्त्याचे काम दर्जेदार करावे असे आवाहन यावेळी केले. या रस्त्याच्या भूमिपूजन कामासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे येणार होते पण अचानक मुंबई येथे बैठक लागल्याने व अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असल्याने येऊ शकले नाही. असा खुलासा करण्यात आला

यावेळी नगरसेवक नंदकुमार तनपुरे, शहाजी जाधव, अशोक आहेर, गजानन सातभाई, संजय साळवे, एकनाथ तनपुरे, राजेंद्र बोरकर, अशोक कदम, पांडुरंग उदावंत, राजेश कदम, गणेश धाडगे, प्रवीण कदम, मुळा प्रवराचे माजी संचालक अय्युब पठाण, राहुरी सेवा संस्थेचे चेअरमन बाबासाहेब तनपुरे, आबासाहेब वाळुंज, कान्हूजी तारडे, कांता तनपुरे, डॉ संकेत दुधाडे, बाळासाहेब पेरणे, अयुब शेख, प्रवीण सुराणा, रोहिदास अडागळे, ज्ञानेश्वर जगधने, सौरभ उंडे, केतन पोपळघट आदि उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.