Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची संपत्ती ईडीने केली जप्त

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. आता मलिक यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने ही मोठी कारवाई केलेली आहे. कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड, वांद्रे कुर्ला संकुलातील एक मालमत्ता आणि जमिनीची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पारकरशी संबंधित असल्याचा आरोप

नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असणाऱ्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. ईडीने नवाब मलिक यांच्याशी संबंधीत ८ मालमत्ता जप्त केल्याची माहिती मिळत आहे. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडचा व्यवहार नवाब मलिक यांनी कुख्यात डॉन दाऊदची बहिण हसीना पारकरशी संबंधित असल्याचा आरोप ईडीने केला होता. त्याच आरोपांखाली नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.

कोणती संपत्ती केली जप्त?

उस्मानाबादमधील मलिकांची 147 एकर जमीन, कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड, कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स, वांद्रे पश्चिमेतील 2 फ्लॅट. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी ईडी कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.