Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…’ही’ गोष्ट वेळीच रोखली पाहिजे

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

उदगीर – राज्याच्या राजकारणामध्ये सध्या ऐतिहासिक लिखाणावरुन वाद सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलताना पवार यांनी ऐतिहासिक लिखानासंदर्भात भाष्य केलंय. साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा जाणवत आहे, असं सांगतानाच ऐतिहासिक लिखान हे पुराव्यांच्या आधारे असावं असंही मत पवार यांनी मांडलंय.

Breaking! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि दिलीप वळसे पाटील अडचणीत?

“इतिहासकाराने सबळ पुराव्याधारे न लिहिता ऐकीव व तार्किक माहितीच्या आधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो अनेक दीर्घकालीन वाद-विवादांना जन्म देतो. असे लेखन वेळीच रोखले पाहिजे,” असे मत पवार यांनी व्यक्त केलंय. तसेच, “विशिष्ट विचाराधारित साहित्यनिर्मिती अतिशय धोकादायक आहे. अशा प्रचारकी साहित्यनिर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असते,” असंही पवार म्हणालेत.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! बँकेत न जाता मोदी सरकारतर्फे मिळणार सहज कर्ज

“राज्यकर्त्यांनी साहित्य आणि माध्यमांची कमकुवत अंगे ओळखली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेतली आहे. चित्रपट क्षेत्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. हाच ‘कॉर्पोरेटीकरणा’चा प्रयोग आता साहित्यात होत आहे,” असंही पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. त्याचप्रमाणे पुढे बोलताना, “तोट्यातील प्रकाशन संस्था ताब्यात घेतल्या जात आहेत. हे असेच सुरू राहिले तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही. हे टाळायचे असेल तर साहित्यिकांना डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागेल,” अशा शब्दांत पवारांनी साहित्यिकांना एका नव्या लढ्यासाठी सज्ज राहाण्याचे आवाहन केले.

Trending Viral Video: नवरीच्या एन्ट्रीकडे नवरदेवाचं दुर्लक्ष, वधूला राग आल्यावर काय घडलं बघाच

“साहित्यविश्वातदेखील राजकारणाचा शिरकाव झाला आहे. विशेषत: संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड निवडणूक पद्धतीने सुरू झाल्यानंतर साहित्यिकांच्या अंतरंगात आमच्यातील राजकारणी घुसू लागला आहे. त्याचा अत्याधिक तोटा महिला साहित्यिकांना संभवतो,” असंही पवार यावेळी बोलताना म्हणाले.

“महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षांतून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हाव्या, अशी तरतूद असावी. महिला धोरणाचा पुरस्कारकर्ता म्हणून मी येथे उभा राहिलो याची चर्चा साहित्य संमेलनात झाली तर मला आनंदच होईल,” असंही त्यांनी म्हटलंय.

पवार यांनी कवितांची पुस्तके आज कमी होत चालली आहेत, अशी खंतही व्यक्त केली. काव्यसंग्रह प्रकाशनाच्या अर्थकारणाचे गणित जुळत नसल्याने हे घडत असावे, असे ते म्हणाले.

क्रिकेट विश्वात खळबळ! IPL सुरु असतानाच ‘या’ दिग्गज खेळाडूचा धक्कादायक निर्णय; महत्वाचं कारण समोर

Leave A Reply

Your email address will not be published.