Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्हं धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – शिवसेना पक्षातून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत ठाकरेंना अनेक धक्के दिले आहेत. मात्र, आता दिलेला हा धक्का सर्वात मोठा मानला जात आहे. शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना खासदारांचाही वेगळा गट तयार झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्हं धनुष्यबाण शिंदे गटाला मिळण्याची शक्यता वाढली आहे.

12 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला

त्याआधी शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावल्याचं वृत्त आहे. शिवसेनेचे एवढे खासदार शिंदे गटासोबत असतील तर ही संख्या दोन-तृतियांशपेक्षा जास्त आहे, त्यामुळे शिवसेनेला विधानसभेपाठोपाठ लोकसभेमध्येही धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे 12 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसेही नव्या गटात जाणार आहे. नव्या गटाचे प्रवक्तेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.