Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांची डिझेलच्या खर्चातून होणार सुटका, ‘या’ योजनेत मिळणार 75% अनुदान

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक होत चालला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोलसह डिझेलच्या किंमतीही वेगाने वाढत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात बसत आहे. विशेषतः त्या शेतकऱ्यांना ज्यांच्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही. मोटरच्या सहाय्याने पाणी उपसा करून ते शेतापर्यंत पोहोचवावं लागतं. यासाठी डिझेलवर चालणारा पंप, तसेच डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरचा वापर करण्यात येतो.

पंतप्रधानांची भेट घेऊन शरद पवारांनी ‘त्या’ तिघांचा केला करेक्ट कार्यक्रम! राज्याच्या राजकारणात खळबळ

पीएम कुसुम योजना

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतं. शेतातील सिंचनासाठीही केंद्र सरकारची विशेष योजना उपलब्ध आहे. या योजनेमुळे कित्येक शेतकऱ्यांच्या सिंचनाचा खर्च शून्य होऊ शकतो. तसंच, शेतकरी आपल्या शेतात सिंचन योजना राबवण्यासाठी सबसिडीही मिळवू शकतात. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन, नफ्यात वाढ होऊ शकते. या योजनेचं नाव आहे, पंतप्रधान कुसुम योजना.

होम लोन घेण्याचा विचार करताय? ‘या’ बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज

पंतप्रधान कुसुम योजना शेतकऱ्यांना फायद्याची

डिझेलची वाढती किंमत, आणि वीज भार नियमन अशा अडथळ्यांना पार करण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे. ज्या भागामध्ये अनियमित पाऊस पडतो, किंवा जिथे सिंचनाची योग्य सुविधा उपलब्ध नाही अशा सर्व भागांमध्ये हे सोलर पंप उत्तम पर्याय ठरू शकतात. हे पंप सूर्यप्रकाशापासून तयार केलेल्या उर्जेवर चालत असल्यामुळे याला वीज कनेक्शनचीही आवश्यकता नाही. त्यामुळे शेतात पाणी देण्यासाठी लाईट येण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तसेच जनरेटरचा खर्चही करण्याची गरज नाही आणि वीजेच्या बिलाचीही चिंता नाही, म्हणजेच जवळपास शून्य खर्चामध्ये शेतकरी आपल्या शेताला पाणी देऊ शकतात.

आयपीएल २०२२ – रोहित शर्माची डोकेदुखी वाढली, टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर ठरतोय फेल

योजनेला तब्बल 75 टक्के अनुदान

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतात सोलर पंप बसवण्यासाठी अनुदान दिली जाते. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती. शेतात सोलर पंप बसवण्यासाठी या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान दिलं जातं. यातील 30 टक्के अनुदान केंद्र सरकारकडून, तर 45 टक्के अनुदान राज्य सरकारकडून दिलं जातं. त्यामुळे सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 25 टक्के रक्कम खर्च करावी लागते. विशेष म्हणजे या सोलर पंपांना विमा सुरक्षाही दिली जाते. त्यामुळे सोलर पंपमध्ये काही बिघाड झाल्यास, शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.