Take a fresh look at your lifestyle.

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून सात महिन्यात पश्चिम रेल्वे विभागाने वसूल केला ११४ कोटींचा दंड

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : हल्ली दूरवर प्रवास करायचे झाल्यास कमी खर्चात प्रवासाचे माध्यम म्हणून देशभरात लोक रेल्वेचा पर्याय निवडतात. अशावेळी मोठ्या प्रमाणात रेल्वेमध्ये गर्दी जमलेली दिसते अनेकदा रेल्वे तिकीट तपासणाऱ्यांची नजर चुकवत प्रवास करू हा विचार करत अनेक प्रवाशी विनातिकीट प्रवास करण्याचे धाडस दाखवतात. नेमक्या अशाच फुकट्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला असून मागील सात महिन्यात एकूण ११४ कोटींचा दंड वसूल करण्यात रेल्वे प्रशासनाला यश मिळाले आहे.

‘या’ दोन मोठ्या व्यक्तींच्या पत्नींना मिळणार निवडणूक लढविण्याची संधी; गुजरात आणि उत्तरप्रदेश मधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

अनेक प्रवासी नजर चुकवेगिरी करत फुकट प्रवास करतात ही बाब पश्चिम रेल्वेच्या माहितीत होती, नेमके अशा प्रवृत्तीवर आळा घालत अनियमित आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी ‘तीव्र तिकीट तपासणी’ मोहीम राबविण्यात आली होती. लोकल, विशेष गाड्या, मेल एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांवर यावेळी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत जवळपास १७ लक्ष लोकांवर कारवाई करत एकूण ११४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अर्थविश्व : जागतिक मंदीत अमेरिकेतील नोकरकपातीचा भारताला फायदा; भारतात गुंतवणुकीचा कल वाढणार

पश्चिम रेल्वेकडून करण्यात आलेल्या कारवाईत सामान बुकिंग न करता विनातिकीट प्रवास करणारे अनेक प्रवाशी आढळून आले. अशीच प्रकरणे मागील वर्षी सुमारे ७ लाख इतकी होती ज्यामध्ये यंदा ७ महिन्याच्या कालावधीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनानंतर रेल्वे प्रवास सुरळीत झाल्याने तसेच पूर्वीप्रमाणे सर्वच रेल्वे गाड्या धावत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून विना तिकीट प्रवास करण्यावर चाप बसविण्याच्या उद्देशाने सदरची कारवाई करण्यात आली होती.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.