Take a fresh look at your lifestyle.

रस्ता विकासासाठी १५७ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी : खा.डॉ. विखे पाटील

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

लोणी : जामखेड शहरातून जाणा-या एन.एच ५४८ डी जामखेड ते सौताडा या १३.४० कि.मी लांबीच्‍या कॉक्रीट रस्‍त्‍याच्‍या कामाच्‍या केंद्र शासनाकडे सादर करण्‍यात आलेल्‍या प्रस्‍तावास केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली. तसेच १५७ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकर या रस्‍त्‍याच्‍या कामाला सुरुवात होणार असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

जामखेड शहरातून जाणारा हा प्रमुख रस्‍ता असून जामखेड शहरामध्‍ये ३.६०कि.मी लांबीमध्‍ये कॉक्रेटीकरणासह या रस्‍त्‍याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तसेच शहरातील काही भागात कॉक्रीट गटार, दुभाजक, पथदिवे इत्‍यादी सुविधा उपलब्‍ध केल्‍या जाणार असल्‍यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्‍यास मदत होणार असून नागरीकांच्‍या दृष्‍टीने हा रस्‍ता दळणवळणासाठी मोठा उपयुक्‍त ठरणार आहे.

उर्वरीत लांबीत इतर ठिकाणी गावातून जाणा-या रस्‍त्‍याची रुंदी १० मिटर असून, त्‍यामध्‍ये कॉंक्रीटीकरण व बाजुला गटारीपर्यंत डांबरीकरण व रुंदीकरण केले जाणार आहे. साकद फाटा, मोहा, सौताडा या भागात रस्‍त्‍याच्‍या कडेने कॉक्रीट गटार केली जाणार आहे. विंचरणा नदीवर नवीन मोठ्या पुलाचे बांधकाम करण्‍यात येणार असून उर्वरीत रस्‍त्‍याच्‍या लांबीमध्‍ये नागरीकांच्‍यादृष्‍टीने तीन नवीन लहान पुलांचे बांधकाम करण्‍यात येणार आहे. सौताडा घाटातील चढ कमी करुन वाहतुकीच्‍या सुरक्षिततेसाठी रस्‍त्‍याचे रुंदीकरण करण्‍यात येणार असल्‍याचे खा.डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील सर्वागीण विकासासाठी नेहमीच आपण प्रयत्‍नशिल आहोत. कर्जत-जामखेड मतदार संघातून जाणारा चाकण, शिक्रापूर, न्‍हावरा, श्रीगोंदा जामखेड ५४८ डी हा प्रमुख महामार्ग असल्‍याने या महामार्गापैकी श्रीगोंदा ते जामखेड या टप्‍प्‍याला केंद्रीय रस्‍तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. यापुढेही मतदार संघातील रस्‍त्‍यांच्‍या उर्वरित कामांसाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्‍याकडे पाठपुरावा सुरु असल्याचे खा.डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.