Take a fresh look at your lifestyle.

Mahindra Thar चा अपडेटेड लुक बघितलात का? कंपनीने फीचर्ससह नवी किंमत पाहा

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : Mahindra Thar Features Upgraded: ऑफ रोडर एसयूव्ही हा शब्द जरी ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर ज्या कार्स येतात त्यातलं पहिलं नाव हे महिंद्रा थार हेच असतं. ही कार भारतीय ग्राहकांची आवडती ऑफ रोडर एसयूव्ही आहे. या कारने भारतीय ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.

💥Breaking News – महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, एकनाथ शिंदे ‘या’ 11 आमदारांसह गुजरातमध्ये

या कारचा दमदार लूक मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करतो. लूकशिवाय या कारचं दमदार इंजिन आणि त्यातले फीचर्स देखील या कारला उत्कृष्ट बनवतात. दरम्यान, महिंद्राने आता या महिन्यात आपली थार एसयूव्ही अपडेट केली आहे. अपडेटनंतर ही कार आणखी खास बनली आहे.

महिंद्रा थार २०२२ या व्हर्जनमध्ये दोन्ही बम्पर आता काळ्या रंगाचे असतील. यासोबतच यात सिएट कंपनीचे टायर बसवण्यात आले आहेत. नवीन थार अपग्रेड करताना कंपनीने यात एक यूएसबी पोर्ट कमी केला आहे. परंतु त्याने फारसा परिणाम होणार नाही. मात्र आता या कारमध्ये एका वेळी एकच फोन चार्ज करता येईल.

मोठी बातमी! जन धन खातेधारकांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला थेट खात्यात मिळणार ‘इतकी’ रक्कम

कोणते फीचर्स वाढवले कोणते हटवले?

कंपनीने नवीन अपडेटमध्ये कारचे काही फीचर्स कमी केले आहेत, तर काही वाढवले आहेत. नवीन अपडेटेड कारमध्ये एकच यूएसबी चार्जर मिळेल. आधीच्या मॉडेलमध्ये दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले होते. यासोबतच समोरच्या सीटमधील अॅडजस्टेबल नॉबही काढण्यात आला आहे. आता तुम्हाला महिंद्रा थारमध्ये Ceat CrossDrive AT टायर्स पाहायला मिळतील. पूर्वी या कारमध्ये MRF टायर्स देण्यात आले होते. त्याचबरोबर कारच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला ब्लॅक बम्पर मिळेल. कंपनीने कार अपडेट केली असली तरी याच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

होम लोन घेण्याचा विचार करताय? ‘या’ बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज

किंमत १३.५३ लाख रुपयांपासून…

रफ अँड टफ लूक असलेली ही कार भारतात AX(O) आणि LX या ट्रिम लेव्‍हलच्‍या एकूण १० व्हेरिएंट्समध्ये येते. या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत १३.५३ लाख रुपये इतकी आहे, तर या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना १६.०३ लाख रुपये मोजावे लागतील. या किंमती दिल्लीतल्या एक्स शोरूममधल्या आहेत. या कारमध्ये कंपनीने २१८४ सीसी क्षमतेचं डिझेल आणि पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये येतं. ही कार १५.२ किमी प्रति लीटर पर्यंतचं मायलेज देते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.