Take a fresh look at your lifestyle.

जागतिक श्रीमंतांच्या यादीतील आठ अब्जाधिशांना ४१ अब्जाचा फटका; ‘या’ भारतीय उद्योगपतींची चांदी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय शेअर बाजारात पडझडीचे सत्र गेले अनेक दिवस बघायला मिळाले यामध्ये जून-जुलै महिन्यात शेअर निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले होते. आता शेअर मार्केट किरकोळ पडझडीसह सावरताना दिसत आहे. सध्या जगभरात मंदीचे सावट असून महागाईसोबत भारतच नव्हे तर जगातील प्रमुख अर्थसत्ता असलेला अमेरिका संघर्ष करताना दिसत आहे. सध्या अमेरिकेत वाढती महागाई, फेडरल रिझर्व्ह बँकेने वाढविलेले व्याजाचे दर यामुळे अमेरिकन शेअर बाजार कोसळला आहे. शेअरच्या पडझडीची जणू काही सुनामी अमेरिकेत आली असून याचा सर्वाधिक फटका जगातील १० श्रीमंत लोकांच्या यादीतील ८ अब्जाधिशांना बसला आहे.

मुंबईत ईडीची कारवाई; हाती लागलं मोठं घबाड

यादीनुसार पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावरील श्रीमंत व्यक्ती हे अमेरिकेतील असून यामध्ये टेस्लाचे इलॉन मस्क व अमेझॉनचे जेफ बेझोस यांचा समावेश आहे, सध्या या दोन्ही अब्जाधिशांना शेअर बाजार कोसळल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे. अमेरिकेतील तिसरे मोठे उद्योगपती म्हणजे मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना देखील सध्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. सध्या यादीतील आठ अब्जाधिशांना ४१ अब्जाचा फटका बसल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजेरी लावणार

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी व मुकेश अंबानी यांचा देखील क्रम लागतो. सध्या या यादीत गौतम अदानी तिसऱ्या स्थानावर असून मुकेश अंबानी नवव्या स्थानी आहे. ताज्या माहितीनुसार टेस्लाचे एलॉन मस्क यांना ८.३५ अब्ज डॉलर, अमेझॉनच्या जेफ बेझोस यांना ९.८४ अब्ज डॉलर तर बिल गेट्स यांना २.८४ अब्ज डॉलरचा आर्थिक फटका शेअर बाजार कोसळल्याने बसला आहे. याउलट भारतीय उद्योपती गौतम अदानी, मुकेश अंबानी यांची चांदी झाली असून या दोन्ही भारतीयांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. सध्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत १.५८ अब्ज डॉलरची वाढ झाली असून, मुकेश अंबानी यांची संपत्ती १.२३ अब्ज डॉलरने वाढली आहे.

राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेला भाजपचा दणका; गोव्यात काँग्रेसला खिंडार

जगातील काही देश महागाई व आर्थिक संकटांमुळे अक्षरशः कोलमडले असून यामुळे राजकीय बदल देखील घडले परंतु भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेली भरारी, जीडीपी मध्ये झालेली वाढ तसेच स्थिरावलेला शेअर बाजार आशादायी चित्र निर्माण करणारा आहे. केंद्र सरकारने महागाईवर आळा घालणे अत्यंत महत्वाचे आहे कारण जनतेची वस्तू खरेदीची क्षमता अधिक काळ मंदावल्यास यामुळे बाजारातील उलाढालीवर विपरीत परिणाम होईल. महागाई जर अवाक्यात आणली गेली व देशाची गरज भागवून वस्तू निर्यातीला चालना दिल्यास येत्या काळात भारत आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करेल यामध्ये काहीच दुमत नाही आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.