Take a fresh look at your lifestyle.

5G Spectrum : आताची सर्वात मोठी बातमी! लवकरच तुमच्या दारी 5 जी सेवा… स्पेक्ट्रम लिलावाला केंद्राची मंजुरी!

ओटीटी न्यूज नेटवर्क

5G Spectrum Auction – अलीकडेच केंद्र सरकराने 5जी सेवांचीचाचणी पूर्ण झाली असल्याचं जाहीर केलं होतं. जवळपास तेव्हापासून सर्वसामान्य नागरिक आणि टेलीकॉम कंपन्यांना 5जी स्पेक्ट्रमच्या लिलाव प्रक्रियेची प्रतिक्षा होती. या लिलाव प्रक्रियेनंतर देशात 5जी सेवांची सुरूवात होणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. 5G

पुढील महिन्यात येतेय देशातील सर्वात स्वस्त Electric Car, बुकिंगला झाली सुरुवात

महत्वाचं म्हणजे, स्पेक्ट्रम लिलावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांची प्रतिक्षा संपली आहे. पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली 14 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Central government) बैठकीत 5G स्पेक्ट्रमबाबत (5 G Spectrum) मोठा निर्णय समोर आला आहे.

महागाईचा मोठा फटका! गॅस कनेक्शन घेणेही झाले महाग, आता मोजावी लागणार ‘इतकी’ रक्कम

कॅबिनेटने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला (5G Auction) मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात दूरसंचार विभाग (DOT) लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात करेल. लिलावात स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाने 5G झाले विकसित

दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी या महिन्यात सांगितले होते, ‘भारत सरकार या वर्षी ऑगस्टपर्यंत स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित 5G तंत्रज्ञान सुरू करू शकते.’ खरं तर, त्यांनी ही टिप्पणी जिनिव्हा येथे आयटीयू या UN संस्थेने आयोजित केलेल्या वर्ल्ड समिट ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS) 2022 मध्ये बोलताना केली. राज्यमंत्री म्हणाले, ‘सरकार दूरसंचार तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संशोधन आणि विकास निधी सुरू करते आहे. महत्त्वाचे म्हणजे, IT प्रमुख TCS आणि सरकारी मालकीची CDoT ही दूरसंचार संशोधन संस्था स्वदेशी पद्धतीने 5G तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेली आहेत.

10वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार

खरे तर दूरसंचार कंपन्या 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून करत होत्या. सरकारकडून ही मंजुरी मिळाल्यानंतर पुढील महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. तुमच्या माहितीसाठी सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे आणि हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल. या अंतर्गत 600, 700, 800, 1,800, 2,100, 2,300 आणि 2,500 MHz बँडचा लिलाव होणार आहे.

💥शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता पीएम किसान योजनेचे पैसे घरपोच मिळणार; ‘ही’ आहे सरकारची खास योजना

ट्रायची 20 वर्षांच्या वैधतेवर सहमती

तुमच्या माहितीसाठी दूरसंचार विभागाने ( DoT) लिलावासाठी स्पेक्ट्रमच्या 20 वर्षांच्या वैधतेच्या कल्पनेशी सहमती दर्शवली आहे. कारण TRAI ने 20 वर्षांच्या आधारावर राखीव किंमतीची गणना केली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला, 5G शी संबंधित शिफारशींमध्ये, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) म्हटले होते की संबंधित बँडच्या संदर्भात 30 वर्षांसाठी स्पेक्ट्रम वाटपाची राखीव किंमत 20 वर्षांसाठीच्या स्पेक्ट्रम वाटपाच्या राखीव किंमतीच्या 1.5 पट इतकी असली पाहिजे. म्हणजेच दूरदर्शननेही यावर सहमती दर्शवली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Comments are closed.