Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! दाट जंगल आणि पाऊस; भीमाशंकर ट्रेकिंग दरम्यान ६ तरूण बेपत्ता

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

भीमाशंकर – सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच, अनेक तरुण तरुणी ट्रेकिंग तसेच निसर्ग पाहण्यासाठी बाहेर पडताना तसेच निसर्गाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. अशातच, भीमाशंकर येथून आताची सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. उल्हासनगरहून काही तरुण भीमाशंकर ट्रेकिंगसाठी आलेले होते. मात्र, त्यातील तब्बल सहा तरूण बेपत्ता झाले होते. दाट जंगल, मुसळधार पाऊस आणि धुके यामुळं रस्ता चुकलेले तरूण अखेर ११ तासांच्या थरारानंतर सुखरूप परत आले आहेत.

घोडेगाव पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे बेपत्ता झालेले सहाही जण सुखरुप परतले आहेत. त्यानंतर सर्व जण भीमाशंकर येथे पोहोचले असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे तब्ब्ल ११ तास हा थरार सुरु होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील खांडस परिसरातून भीमाशंकर ट्रेकिंगसाठी तरुणांचा ग्रुप सह्याद्रीच्या डोंगरातून निघाला होता. मात्र, दाट जंगल आणि मुसळधार पावसामुळं त्यांना रस्ता सापडला नाही आणि ते चुकले. ही बाब कानावर येताच घोडेगाव पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले.

हे तरुण खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात रस्ता चुकले होते. त्यांना घोडेगाव पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, मुसळधार पाऊस कोसळत होता. दाट धुकेही होते. डोंगराळ भाग असल्याने त्यांचा लोकेशनही ट्रेस होत नव्हता. मात्र, काही वेळाने त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्यात आला. त्यांचा शोध सुरू होता.


पवन अरुण प्रतापसिंग (वय 26), सर्वेश श्रीनिवास जाधव, नीरज राजाराम जाधव, दिनेश धर्मराज यादव, अंकुश सत्यप्रकाश तिवारी, हितेश श्रीनिवास यादव (सर्व राहणार- उल्हासनगर) हे सहा जण मुरबाड येथून बैलघाटमार्गे भीमाशंकरकडे ट्रेकिंगसाठी निघाले होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळं संध्याकाळीच अंधार होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रस्ता दिसेनासा झाला आणि हे सर्व ट्रेकर्स वाट चुकले.

Leave A Reply

Your email address will not be published.