Take a fresh look at your lifestyle.

सुवर्णसंधी! मुंबईतील लघुबाद न्यायालयात 7 वी ते 10 वी उत्तीर्णांसाठी भरती; ‘या’ पत्त्यावर करा अर्ज

0
maher

ओटीटी न्युज नेटवर्क

मुंबई – नोकरीच्या शोधात असणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. लघुबाद न्यायालय, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. दरम्यान, यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रंथपाल, चौकीदार, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 अशी नमूद करण्यात आली आहे.

पद, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ग्रंथपाल ( Librarian) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवाराने लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून डिप्लोमा केलेला असावा.

उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असल्यास उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

चौकीदार (Watchman) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे

सफाई कामगार (Sweeper) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे

 पगार

ग्रंथपाल  – 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना

चौकीदार  – 15,000/- – 47,600/- रुपये प्रतिमहिना

सफाई कामगार – 15,000/- – 47,600/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रं

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रबंधक, लघुवाद न्यायालय,लोकमान्य टिकल मार्ग, धोबी तलाव, मुंबई – 400 002.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.