Take a fresh look at your lifestyle.

दहा गावातील स्मशानभुमीचा विकास करण्यासाठी 97 लाख 50 हजाराचा निधी मंजूर

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी – जिल्हा नियोजन समिती जनसुविधा योजनेअंतर्गत राहुरी, नगर, पाथर्डी या विधानसभा मतदार संघातील दहा गावांना स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी सुमारे 97 लाख 50 हजार रुपये इतक्या निधी खर्चास मंजुरी मिळाली आहे. याविषयी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती दिली.

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे 9 लाख 75 हजार, डिग्रस येथे 9 लाख 75 हजार, सात्रळ माळेवाडी येथे 9 लाख 75 हजार, चिंचविहिरे येथे 9 लाख 75 हजार, शिलेगाव येथे 9 लाख 75 हजार, चंडकापूर येथे 9 लाख 75 हजार, चेडगाव येथे 9 लाख 75 हजार तर पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे 9 लाख 75 हजार, मिरी येथे 9 लाख 75 हजार, तर नगर तालुक्यातील ससेवाडी येथे 9 लाख 75 हजार अशा एकूण दहा गावांमध्ये 97 लाख 50 हजार रुपये खर्च करून स्मशानभूमीचा विकास करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

दरम्यान, या निधीच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी सहकार्य केले. गेल्या अनेक दिवसापासून स्मशानभूमीचा विकास करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्या मागणीचा विचार करून मंत्री तनपुरे यांनी प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.