Take a fresh look at your lifestyle.

आज सोन्या-चांदीबाबत होणार मोठा निर्णय; यामुळे दरात मोठी घसरण

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड काळात सोन्याने उच्चांक गाठला. सोने 56 हजार रुपये प्रति तोळा होते. पण हळूहळू दोन वर्षांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आता भारतात सोन्याची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव घसरले आहेत. सोन्याचे भाव घसरण्यामागचे खरे कारण काय आहे, ते पाहुयात.

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव २९ महिन्यांतील सर्वात निच्चांकी पातळीवर आला. एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच किंमत इतकी कमी झाली आहे. हे दर 0.7 टक्क्यांनी घसरले. आता येत्या काळात दर ०.६ टक्क्यांनी घसरणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाची बातमी : १ ऑक्टोबर पासून क्रिकेटमध्ये ‘हे’ नवे नियम लागू होणार; ‘आयसीसी’चा निर्णय

महागाई वाढली की लोक सोन्याकडे वळतात, पण गोल्ड बॉण्ड्सवर व्याजदर वाढल्यानंतर लोक सोने ठेवण्यास प्राधान्य देत नाहीत. लोक गोल्डमधील पैसे काढतात. डॉलरचे मूल्य वाढत आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा धोकाही वाढत चालला आहे.

यूएस फेडरलच्या आजच्या बैठकीवरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा केवळ शेअर बाजारावरच परिणाम होणार नसून सोन्या-चांदीच्या दरावरही परिणाम होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. फेडची दोन दिवस बैठक होत आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होऊ शकतो.

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी 5G सेवा होणार लाँच

या बैठकीत व्याजदरात 75 अंकांनी वाढ करण्याबाबत चर्चा सुरू आहे. परिणामी 100 bps मार्केट वाढू शकते. हा दर केवळ 20 टक्के असल्याची नोंद करण्यात आली आहे. चांदी 1.1 टक्क्यांनी घसरली. प्लॅटिनममध्ये 0.3 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजची बैठक खूप महत्त्वाची आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.