Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; आज कशी असेल बाजाराची स्थिती?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

Share Market : भारतीय शेअर बाजारातील सलग चार दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. जागतिक बाजारातून विशेष पाठिंबा नसला तरी स्थानिक बाजारात कालच्या तुलनेत खरेदीचा कल दिसून येत आहे. आज, मार्केट हेवीवेट्स रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि TCS यांच्यामुळे हिरवेगार आहे. बाजारात सुरुवातीला थोडी वाढ झाली आहे. बीएसईचा प्रमुख 30 शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 231 अंकांनी 57 हजार 376 वर उघडला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी देखील 17 हजार 110 च्या हिरव्या चिन्हावरून उघडला.

छगन भुजबळांची जीभ घसरली; शाळेत सरस्वतीचा फोटो का? प्रश्न केला उपस्थित

आठवड्याच्या सुरुवातीला मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 231.30 अंकांनी किंवा 0.40 टक्क्यांनी वाढून 57,376 वर उघडला. तसेच, NSE चा निफ्टी 94.60 अंक किंवा 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 17,110 वर उघडण्यात यशस्वी झाला.

मार्केटची स्थिती काय?

आज बाजार उघडण्यापूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात व्यवहार करत होते. सेन्सेक्स 138 अंकांनी किंवा 0.24 टक्क्यांनी वाढून 57,283 वर व्यवहार करत होता. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 122 अंकांनी किंवा 0.72 टक्क्यांनी वाढून 17,138 वर व्यवहार करत होता.

एअर इंडियाची जलद परतावा प्रक्रिया सुरु; प्रलंबित प्रवासभाडे लवकर मिळणार

कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्समध्ये एचयूएल, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, नेस्ले आणि भारती एअरटेल याशिवाय सन फार्मा, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ रेड्डीज लॅब्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एसबीआय, एचडीएफसी बँक, एल अँड टी, टायटन, एसबीआय, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, विप्रो, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, टाटा स्टील, एम अँड एम आणि पॉवरग्रीड हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.