Take a fresh look at your lifestyle.

भारत सरकारचा मोठा निर्णय; तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central government) तुकडा तांदळाबाबत  (BROKEN RICE) मोठा निर्णय घेतला आहे. विदेश व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार शुक्रवारपासून भारताने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कमी पावसामुळे देशातील अनेक भागात यंदा तांदूळ उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, म्हणूनच भारतातील अन्नसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गहू आणि साखरेनंतर तुकडा तांदळाच्या निर्यातीवरही (export) बंदी घालण्यात आली आहे. (Ban on export of broken rice)

शेअर बाजारात मोठी उसळण; सेन्सेक्सने गाठला ‘इतक्या’ हजारांचा टप्पा

कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारताकडे बघितले जाते. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. या हंगामात तांदळाखालील एकूण क्षेत्र १२ टक्क्क्यांनी कमी झाले आहे.

कृषी मंत्रालयाने एका वर्षापूर्वी तांदळासाठी असलेले ३५.३६ मिलियन हेक्टर १२ ऑगस्टपर्यंत भाताचे क्षेत्र ३०.९८ मिलियन हेक्टर (७६.५५ दशलक्ष एकर) पर्यंत घसरले आहे, मात्र, उसासाठी वाटप केलेले क्षेत्र ५.४५ मिलियम वरून ५.५२ मिलियन हेक्‍टर इतके वाढले आहे. दरम्यान, भारतातून तांदळाच्या एकूण निर्यातीत तुकडा तांदळाचा वाटा जवळपास २० टक्के आहे आणि जगाच्या एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के आहे.

हा परतीचा पाऊस नसून मान्सूनच; हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

देशातील तांदूळ उत्पादक राज्ये

भारतातील प्रमुख अन्न भात आहे. जास्त भात पिकवणाऱ्या राज्यांमध्ये तांदूळ जास्त खाल्ला जातो, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, आसाम आणि हरियाणा ही भारतातील प्रमुख तांदूळ उत्पादक राज्य आहेत. पंजाब आणि हरियाणा राज्यांतील मुख्य अन्न चपाती आहे, परंतु अधिक पैसे कमावण्यासाठी तेथील शेतकरी भात शेती करतात.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.