Take a fresh look at your lifestyle.

देशांतर्गत भाववाढ नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय; रवा, मैदा व पीठ निर्यातीवर सरकारची करडी नजर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारत सरकार (Government of India) सध्या देशांतर्गत भाववाढ (Price Hike)कमी करण्याचा प्रयत्न करत असून खाद्यपदार्थांच्या निर्यातीवर (Export) केंद्र सरकार जातीने लक्ष देत आहे. देशाबाहेर होणाऱ्या पदार्थांच्या निर्यातीचा फटका स्थानिक जनतेला नेहमीच बसत असतो, अनेकदा यामुळे अचानकपणे पदार्थांचे भाव गगनाला भिडतात. सोबतच, निर्यात केल्या जाणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकानुसार (International Standard) होणे गरजेचे ठरते, अन्यथा याचा दूरगामी परिणाम व्यापारावर होतो. या सर्व बाबी लक्षात घेता मे महिन्यात केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी (Banned Wheat Export) घातली होती, याचा परिणाम असा झाला की पीठजन्य पदार्थांच्या निर्यातीत तेजी निर्माण झाली. आता यामुळे देशात रवा, मैदा व पीठ (Flour) यांच्या संभाव्य टंचाईवर आळा घालण्यासाठी सरकारने या पदार्थांच्या निर्यातीवर काही बंधने घातली आहे.

‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी खादी उद्योग सरसावला; किंमतींना मात्र बसणार फटका

भविष्यात भारतातून रवा, मैदा व पीठजन्य पदार्थांच्या निर्यातीकरिता आंतर समितीकडून मंजुरी घेणे बंधनकारक राहणार आहे, यासोबतच अशा पदार्थांच्या निर्यातदारांना निर्यात तपासणी परिषदेकडून गुणवत्तेबाबत प्रमाणपत्र घेणे गरजेचे राहणार आहे. याबाबतची अधिकृत सूचना परकीय व्यापार महासंचालनालयाने (Director General of Foreign Trade) जारी केली आहे.

बिहारमधील भाजप सरकार कोसळलं; नितीश कुमार यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

सरकारच्या या धोरणाचा फायदा सध्या झालेल्या दरवाढीवर अंकुश लावण्यात होऊ शकतो सोबतच निर्यात केल्या जाणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेवर देखील याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. देशांतर्गत होणारी खाद्यपदार्थांची तूट (Deficiency) व यामुळे होणारी विक्रमी भाववाढ याचा ताळमेळ बसविणे कुठल्याही सरकारपुढे मोठे आव्हान असते, जागतिक स्तरावर सध्याची महागाईची स्थिती बघता सरकारला अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. परकीय चलनात वाढ (Foreign Currency) होणे जरी आवश्यक असले तरी, देशातील जनतेला माफक दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हे कुठल्याही सरकारचे आद्य कर्तव्य असते, याच नेमक्या धोरणाचे अनुसरण सरकारकडून होत असल्याचे दिसून येत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.