Take a fresh look at your lifestyle.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; लवकरच ‘या’ पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत भरती

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठे आव्हान ठरत असून गेले वर्षानुवर्षे सरकारी नोकरी करिता परीक्षेची तयारी करणारे उमेदवार भरतीप्रक्रियेची वाट बघत आहे. राज्यात विविध शासकीय विभागात एमपीएससी मार्फ़त विविध वर्गाच्या पदभरती केल्या जातात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून यामध्ये कोरोना परिस्थितीमुळे अनियमितता दिसून येत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला असून लवकरच एमपीएससी मार्फत लिपिक वर्ग ३ ची पदभरती लवकरच घेण्यात येणार आहे.

सिनेसृष्टीवर शोककळा; कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन

नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रिक्त लिपिक वर्ग ३ ची पदभरती आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजवर लिपिक पदांची भरती स्वतंत्रपणे घेण्यात येत होती, मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये व योग्य उमेदवारालाशासकीय नोकरीची संधी मिळावी या उद्देशाने प्रथम वेळी एमपीएसी मार्फत घेण्यात येणार आहे.

आज सोन्या-चांदीबाबत होणार मोठा निर्णय; यामुळे दरात मोठी घसरण

सरकारचा हा निर्णय स्तुत्य असून लवकरच यावर अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल व सरकारी रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध होईल अशी आशा शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.