Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात विक्रीची घोडदौड; सेन्सेक्सची धूळधान

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

Share Market : जागतिक शेअर बाजारातील संकेत आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफा वसुलीमुळे भारतीय शेअर बाजारात शनिवारी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ६० हजारांखाली आला असून निफ्टीदेखील १८ हजार अंकांखाली घसरला आहे. शेअर बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४१२ अंकांची घसरण झाली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२६ अंकांची घसरण दिसून आली. सेन्सेक्स ५९ हजार ९३४ अंकांवर तर निफ्टी १७ हजार ८७७ अंकांवर स्थिरावला.

‘या’ प्लानपुढे जिओनेही हात टेकले; अवघ्या २२५ रुपयात लाइफटाइम वैधता

शेअर बाजारात ऑटो, मेटल्स, एनर्जी आदी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. तर, बँकिंग, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअरमध्ये विक्री दिसून आली. स्मॉल कॅपच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर, मिड कॅपमध्ये तेजी दिसून आली. शेअर बाजारात सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या ३ हजार ६२० कंपन्यांपैकी १ हजार ६९८ कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, १ हजार ७९६ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली.

१२६ कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये २९० शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले. तर, १६६ कंपन्यांच्या शेअर दरात लोअर सर्किट लागले. शेअर बाजाराचे बाजार भांडवल २८५.८७ कोटी रुपये इतके झाले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.