Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ची थराराक घटना, कोयत्याने सपासप वार करून तरुणाला संपवलं, घटनेचा LIVE व्हिडीओ व्हायरल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे – पुणे तेथे काय उणे असं आपण नेहमीच म्हणतो. कारण प्रत्येकच बाबतीत पुणे समृद्ध आहे, पुढे आहे. मात्र, याच पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुळशी पॅटर्न हा मराठी चित्रपट आल्यापासून अनेक तरुण त्यातील घटनांचे अनुकरण करताना दिसले. अशातच, पुण्यातून एक अशीच घटना समोर आली आहे ज्यात मुळशी पॅटर्न स्टाईलने एका तरुणाची हत्त्या करण्यात आली.

आता ‘या’ पक्षाला मोठा धक्का; सगळ्या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या (murder) केली आहे. चक्क एखाद्या सिनेमाला शोभेल अशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, या हत्येचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असण्याचा संशय सध्या पोलीसांनी व्यक्त केला आहे. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

मारुती ढेबे हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. या टोळक्याने मारुतीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यात ढेबे याचा जागीच मृत्यू झाला. मारुतीची हत्या केल्यानंतर हल्लेखोर अल्टो कारने पसार झाले.

वर्दळीचा रस्ता असल्याने हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

EPFO धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम लवकर करा पूर्ण, 7 लाखांपर्यंत होईल फायदा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.