Take a fresh look at your lifestyle.

आधार कार्डमध्ये होणार मोठा बदल; UIDAIची माहिती

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar card) महत्त्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो. कोणत्याही ठिकाणी ओळखीचा पुरावा मागितला तर हमखास आधार कार्ड पुढे केले जाते. सुरुवातीला आधार कार्डची गरज मर्यादित होती. पण हळूहळू सरकारने अनेक ठिकाणी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक केले. आता अनेक गोष्टींच्या नोंदणीसाठी आधार कार्ड ओळखीचा आणि निवासाचा पुरावा म्हणून स्वीकारला जातो. सरकार आधार कार्डची व्याप्ती वाढवण्याचा विचार करत आहे. UIDAI नागरिकांना दर 10 वर्षांनी बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित करेल.

मुंबई विद्यापीठाचं कौतुकास्पद पाऊल; भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त ‘संगीत महाविद्यालय’ करणार सुरू

सरकारी पैशांची हानी कमी करण्यासाठी राज्य सरकारांनी त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये आधार कार्डची व्याप्ती वाढवावी, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) राज्यांना सांगितले आहे. त्या दृष्टीने सरकारने पहिले पाऊल उचलले आहे. UIDAI म्हणते की, आधार कार्डवरील बायोमेट्रिक माहिती दर 10 वर्षांनी अपडेट केली जावी. अर्थात, हे सक्तीचे नाही, पण यामुळे बनावट आधार कार्डांना आळा बसेल आणि लोकांची माहितीही सुरक्षित राहील, असे त्यांचे म्हणणे आहे.

5 ते 15 वयोगटातील मुलांसाठी आधार कार्डसंबंधी माहिती अपडेट करण्याचा नियम आहे. या वयोगटातील मुलांचा शारीरिक विकास होत असतो. हाताच्या रेषाही बदलतात. त्यामुळे या वयोगटातील मुलांची माहिती वेळोवेळी अपडेट करावी, असे UIDAIने म्हटले आहे. UIDAI ने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कोणतीही व्यक्ती दर 10 वर्षांनी आधार कार्डची माहिती अपडेट करू शकते.

“…तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील”; राज ठाकरेंचा इशारा

यामध्ये बायोमेट्रिक (Biometric And Demographic) आणि डेमोग्राफिक माहिती समाविष्ट आहे. अजून हा नियम स्वरूपात नाही. ७० वर्षांवरील लोकांसाठी ही माहिती अपडेट करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन ही माहिती अपडेट केली जाऊ शकते. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार कार्ड तत्काळ लॉक करण्याची सुविधा असल्याचे UIDAI ने म्हटले आहे.

या विशेष सुविधेमुळे ग्राहकांना त्यांची माहिती त्यांना हवी तेव्हा लॉक किंवा अनलॉक करता येते. यामुळे डेटा सुरक्षित राहील. आधार कार्डच्या सुरक्षेची समस्या लक्षात घेऊन सरकार आणि UIDAI ने ग्राहकांना त्यांची माहिती आधार अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.