Take a fresh look at your lifestyle.

दहावी, बारावी निकालासंदर्भात आताची मोठी बातमी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार (10th and 12th Results) दहावी तसेच बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा रखडण्याची दाट शक्यता आहे.

पेपर तपासण्यास नकार

दरवर्षीप्रमाणेच यंदाही विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासत असतात. मात्र, यंदा त्यांनी हे पेपर तपासण्यास नकार दिला आहे. विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षकांनी आपल्या काही मागण्या शिक्षण मंडळासमोर मांडल्या आहेत. या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत राज्यातील 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

उत्तरपत्रिकांचे 1200 हून अधिक गठ्ठे तपासणी शिवाय पडून

दरम्यान, सध्याच्या झालेल्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे 1200 हून अधिक गठ्ठे तपासणी शिवाय पडून आहेत. विशेष बाब म्हणजे या आंदोलनाचा परिणाम दहावी, बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता असल्याने भविष्यात शिक्षण मंडळ संकटात सापडण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.