Take a fresh look at your lifestyle.

रोमान्सच्याबाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर ‘हे’ शहर; इथलेच लोक चीटिंगमध्येही पुढे …

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : इंग्लंडमधील ‘द बॉटल क्लब’ने जगभरातील प्रसिद्ध आणि प्रमुख शहरांचा सर्व्हे केला. ही शहरे रोमान्सच्याबाबतीत कशी आहेत हे या सर्व्हेतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व्हेमध्ये जगातील कोणत्या शहरातील लोक रोमान्सच्या बाबतीत एकमेकांना जास्त आकर्षित करतात हे सर्वांत पहिल्यांदा शोधण्यात आले. या सर्व्हेच्या माध्यमातून ‘द बॉटल क्लब’ने जगातील सर्वात रोमँटिक शहर शोधून काढले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

रोमान्सच्या बाबतीत लंडनच अग्रेसर

जगातील सर्वांत जास्त रोमँटिक  आणि सेडक्टिव्ह म्हणजे रोमान्ससाठी उद्युक्त करणाऱ्या शहरांच्या यादीत इंग्लंडची राजधानी लंडननं पहिला क्रमांक मिळवला आहे. डेली स्टारच्या अहवालानुसार, द बॉटल क्लबनं केलेल्या सर्व्हेमध्ये लंडनला 80 पैकी 72.2 गुण मिळाले आहेत. त्यामुळे लंडनला जगातील सर्वात जास्त सेडक्टिव्ह शहर  होण्याचा मान मिळाला आहे. येथील एक लाखांहून अधिक लोकांनी विविध पॉर्न साइट्सवर आपली अकाउंट्स बनवलेली आहेत. लंडनमध्ये 131 अ‍ॅडल्ट इव्हेंट्स  होतात. याशिवाय तेथील 10 हजारांहून अधिक लोक, ओन्ली फॅन्स या अ‍ॅडल्ट सब्सक्रिप्शन साइटवरून पैसे कमवतात. सेडक्टिव्ह शहरांच्या यादीत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेतील लास वेगास आणि न्यूयॉर्क ही शहरं आहेत. लास वेगासला 67.6 गुण मिळाले आहेत, तर न्यूयॉर्कला 66.5 गुण मिळाले आहेत.

हेही वाचा  गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात ‘हा’ आरोपी हजर, तर्कवितर्कांना उधाण

नात्यामध्ये फसवणूक करण्यातही लंडन आघाडीवर

एकमेकांची फसवणूक करण्यातदेखील लंडन शहर आघाडीवर आहे. द बॉटल क्लबच्या सर्व्हेमध्ये यूकेतील सर्वांत जास्त फसवणूक करणाऱ्या शहरांबद्दलही माहिती घेण्यात आली. येथील कपल्स एकमेकांची सर्वाधिक फसवणूक करतात. कमिटेड रिलेशनशिपमध्ये असूनही ते अनेक अफेअर करतात. इलिसीट एन्काउंटर्स नावाच्या वेबसाइटनुसार, लंडनमधील 75 लाख लोकसंख्येपैकी एक लाखांहून अधिक लोकांचं अफेअर आहे. ब्रिटनमधील बर्मिंगहॅम आणि नॉटिंगहॅम या शहरांनी या यादीमध्ये अनुक्रमे दुसरं व तिसरं स्थान मिळवलं आहे.

हेही वाचा  ऐकावं ते नवलंच! महाराष्ट्रातील ‘या’ गावात निघते जिवंत माणसाची प्रेतयात्रा!

लास वेगास शहर दुसऱ्या क्रमांकावर तर जर्मनीची राजधानी बर्लिनचा क्रमांक तिसरा

या सर्व्हेक्षणातील दुसरा विभाग म्हणजे विचित्र पद्धतीनी रोमान्स करणाऱ्या व्यक्तींचा. या बाबतीतही लंडन शहर सर्वोच्च स्थानी आहे. या सर्व्हेनुसार, येथील लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या सेक्स फँटसीज् आणि इच्छा पूर्ण करतात. या कॅटेगरीमध्ये लंडनला 40 पैकी 39 गुण मिळाले आहेत. 38 गुणांसह अमेरिकेतील लास वेगास शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जर्मनीची राजधानी बर्लिनचा क्रमांक लागतो. बर्लिनला 32.5 गुण मिळाले आहेत.

हेही वाचा  ‘द काश्मीर फाइल्स’ने मोडला ‘दंगल’चा रेकॉर्ड, आतापर्यंत केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

Leave A Reply

Your email address will not be published.