Take a fresh look at your lifestyle.

‘अपघातमुक्त भारत’ हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली; मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एक तासानंतर त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केलाय.

मोठी बातमी : मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला; विनायक मेटेंचं अपघाती निधन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्रासाठी ही दुदैवी घटना आहे. मराठा समाजाला न्याय मिळेल,असा त्यांना विश्वास होता. या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं शिवस्मारक, मराठा आरक्षण तसेच महाराष्ट्रातील इतर विषयांकरिता आंदोलन करणारा एक बुलंद आवाज हरपला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

विनायक मेटे यांच्या निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ”रस्त्यावर अनेक अपघात होत असतात. पण आता प्रत्येकाने संवेदनशील नागरिक बनले पाहिजे. या अपघाताचं नेमकं कारण माहिती नाही. पण आपल्याला भारताला अपघातमुक्त केलं पाहिजे आणि हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” अशी प्रतिक्रीया मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं मुंबईत निधन

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील विनायक मेटे यांच्या निधनाबाबत ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक व दुःखद आहे. बीड जिल्ह्यातून राजकीय पार्श्वभूमी नसताना मेटे यांनी विविध आंदोलनातून आपले नेतृत्व सिद्ध केले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी नेहमीच आग्रही असणारे एक तडफदार नेतृत्व महाराष्ट्राने गमावले.” असे ट्विट वळसे-पाटील यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आजचा दिवस दुःखद घटनेने सुरू झाला. मेटे हे संघर्षमय व्यक्तिमत्व, नेतृत्व होते. मराठा आरक्षणासाठी त्यांची लढा उभारला. त्यांच्या मोठा अभ्यास मराठा आरक्षणाचा असतो. आजच्या बैठकीबाबत त्यांनी रात्री सव्वादोन वाजता मेसेज पाठवला होता. सामान्यासाठी लढणारा नेता हरपला आहे.”

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.