Take a fresh look at your lifestyle.

आदित्य ठाकरेंसह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई?; शिंदे गटाचा शिवसेनेला मोठा धक्का

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबईः विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट युतीच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विजय मिळवला. तर रात्री उशिरा विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि प्रतोदपदी भरत गोगावले (Bharat gogawale) यांचीच नियुक्ती वैध ठरवली. या निर्णयामुळं शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुकीसंदर्भात संजय राऊतांचा मोठा दावा

२२ जून रोजी विधानसभा उपाध्यक्ष यांना पत्रानुसार ठराव पाठवला होता. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पदावरुन हटवून अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली होती. ती रद्द करुन एकनाथ शिंदे यांची ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आलेली गटनेते पदाची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर, भरतशेठ गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असं विधिमंडळ सचिवालयानं एकनाथ शिंदे आणि भरतशेठ गोगावले यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

व्हिपवरून शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये संघर्षाची नांदी झाली आहे. एकनाथ शिंदे हे गटनेते व भरत गोगावले हे पक्षाचे प्रतोद आहेत. त्यामुळं त्यांनी जाहीर केलेले व्हिप पाळणं आदित्य ठाकरेंसह इतर शिवसेनेच्या १६ आमदारांना बंधनकारक आहे. अन्यथा या १६ आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते. अशावेळी शिवसेनेतील १६ आमदारांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.

विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्यावेळी शिंदे गटाकडून बजावण्यात आलेल्या व्हिपविरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केली. गोगावले यांनी थेट नार्वेकर यांनाच पत्र लिहित शिवसेनेच्या १६ सदस्यांनी आम्ही बजावलेला व्हिप झुगारत आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर नेमकं काय घडलं?

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्हिपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या १६ आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही असे सांगत व्हीपची चर्चा बाजूला ठेवूयात असे म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनपर भाषणा दरम्यान ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंसोबत असणारे आमदार कोण?

सुनील प्रभू, नितीन देशमुख, राहुल पाटील, संतोष बांगर, वैभव नाईक, सुनील राऊत, रवींद्र वाईकर, भास्कर जाधव, संजय पोतनीस, अजय चौधरी, दिलीप लांडे, प्रकाश फातेरपेकर, राजन साळवी, कैलास पाटील

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.