Take a fresh look at your lifestyle.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीका प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मांडले मत; भविष्याबाबत केला प्रश्न उपस्थित

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वाशीम येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान शिंदे गटाकडून राहुल गांधीविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानाशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. यानंतर खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींना सूचनावजा इशारा देताना असे भाष्य होत असल्यास महाविकास आघाडीत फुटीचे संकेत दिले होते.

राज्य सहकारी बँक निगडित साखर कारखान्यांबाबत महत्वपूर्ण निर्णय; कर्जाचे व्याजदर क्रेडिट रेटिंगनुसार आकारणार

आता उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांवरील टीकेवर आपले मत मांडले आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी देखील आपण राहुल गांधी यांच्या मताशी सहमत नसल्याचे भाष्य केले आहे. “५० किंवा १०० वर्षांपूर्वी कोण योग्य किंवा अयोग्य होते या मुद्द्याला धरूनच जर आज आपण सगळे भांडत राहिलो आणि याच पद्धतीने सर्व सुरु राहल्यास भविष्यासाठी कोण भांडणार?”, असा सूचक प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

फेसबुक वापरकर्त्यांसाठी पुढे आली महत्वाची माहिती ; १ डिसेंबरपासून ‘हे’ नवीन बदल लागू होणार

इथे विशेष बाब म्हणजे आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. परंतू स्वातंत्र्यवीर सावरकर मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या एकापाठोपाठ एक नेत्याकडून राहुल गांधींच्या विरोधात भाष्य केले जात असल्याने, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकरिता हा चिंतनाचा मुद्दा ठरणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.