Take a fresh look at your lifestyle.

‘आरटीई’ अंतर्गत तिसऱ्या टप्प्याची प्रवेश मुदत संपली; रिक्त जागांच्या ‘या’ मोठ्या आकड्याबाबत झाला खुलासा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील खासगी शाळांमध्ये (Private School) आरटीई (RTE) अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागेसाठी प्रवेशाची अंतिम टप्प्याची मुदत नुकतीच संपली आहे. प्रवेशप्रक्रिया (Admission) आटोपल्यानंतर रिक्त जागांचा मोठा आकडा समोर आला आहे, यानुसार राज्यात तब्बल २३,४६४ जागा शिल्लक असल्याची माहिती आहे. आरटीआई अंतर्गत पुष्कळ जागा प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहत असल्याची बाब यापूर्वी समोर आली होती. परिणामी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने (Directorate of Primary Education) पुढील एकूण तीन टप्प्यांत रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली.

टी 20 वर्ल्ड कपनंतर हे खेळाडू घेणार संन्यास?

मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याचे कारण पुष्कळशा खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. सध्या गरज आहे ती अशा शाळांवर कारवाई करण्याची कारण रिक्त जागांचा आकडा डोके चक्रावून सोडणारा आहे. एकट्या मुंबई शहरात ३२१० जागा रिक्त आहेत, तर राज्यातील ९०,६८५ शाळांमध्ये अद्यापही २३,४६४ जागा रिक्त आहे. याबाबत लवकरच कारवाई करून रिक्त जागा भरण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.