Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम; एकूण ६८ हजार कोटींचे कर्ज व ४१ हजार कोटींची महसूल तूट

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्यातील महसुलात कमालीची तूट निर्माण होऊन राज्यावर कर्जाचा बोजा वाढल्याचा अहवाल भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांनी सादर केला आहे. राज्यात विविध व्यापार, व्यवसाय धंदे व किरकोळ बाजारातील आर्थिक उलाढाल तसेच भांडवली खर्चाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यातील आर्थिक स्थितीला फटका बसल्याची स्थिती निर्माण झाली होती. एकूण ४१ हजार कोटींची महसूल तूट झाल्याने राज्यावर ६८ हजार कोटींचे कर्ज वाढल्याचे चित्र आहे.

मोठी बातमी : महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के

या सर्व बाबींचा एकंदरीत परिणाम म्हणजे वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात राज्यातील तिजोरीवर कर्जाचा भार ५ लाख ४८ हजार १७६ कोटी रुपये इतका वाढला होता. या काळात तत्कालीन सरकारने कर्ज देखील घेतले होते परंतु काही सरकारी खर्चात तूट केल्याने आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यास सहाय्य झाल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.