Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक बातमी…१३३ प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : चीनमध्ये 133 जणांना घेऊन जाणारं एक प्रवासी जेट क्रॅश झालं आहे यात अनेकांचा बळी गेल्याची भीती आहे. एका टीव्ही चॅनेलने हि ही माहिती दिली.

मृतांची संख्या आणि अपघाताचं कारण समजू शकलेले नाही

बोइंग 737 विमान गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ शहराजवळील ग्रामीण भागात कोसळलं. यानंतर डोंगराळ ठिकाणी आग लागली. घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत. अपघातातील मृतांची संख्या आणि अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. हे विमान 3 वाजेपर्यंत गांगदोंग येथील गुआंग्शी या ठिकाणी पोहोचणार होतं. मात्र त्याआधीच ही दुर्घटना घडली. ज्याठिकाणी हे विमान कोसळलं त्या परिसरात भीषण आग लागली. अशा स्थितीत अपघातातील मृतांचा आकडा जास्त असल्याचं मानलं जात आहे. बोइंग ७३७ मॉडेलची विमानं यापूर्वीही अनेकदा अपघाताचे बळी ठरले आहेत.

विमान केवळ साडेसहा वर्ष जुने

विमानात 123 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स होते. या दुर्घटनेत किती जण वाचले, किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. अपघातग्रस्त विमान चीनच्या चायना इस्टर्न एअरलाइन्सचे आहे. ज्या विमानाचा अपघात झाला आहे ते केवळ साडेसहा वर्ष जुनं होतं. जून 2015 मध्ये ते एअरलाइन्सने ताब्यात घेतलं होतं. MU 5735 मध्ये एकूण 162 जागा होत्या, त्यापैकी 12 बिझनेस आणि 150 इकॉनॉमी क्लास होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.