Take a fresh look at your lifestyle.

Brahmastra: डोळ्यात आग आणि चेहऱ्यावर जखमा, ब्रह्मास्त्रमधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट Look रिलीज

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – बॉलिवूडच्या (Bollywood) सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक म्हणून आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांना ओळखलं जातं. या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या दोघांच्या ‘ब्रह्मास्त्र’ची (Brahmastra) चाहत्यांना प्रचंड आतुरता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

काही दिवसांपूर्वी आलिया-रणबीरचा लुकसुद्धा समोर आला होता. त्यांनतर आता बिग बी अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लुक (Amitabh Bachchan First Look) समोर आला आहे. मेगास्टारला नेहमीपेक्षा वेगळ्या अंदाजात पाहून चाहते आणखी उत्सुक झाले आहेत.

आधार कार्डवरील फोटो आवडला नाही? या सोप्या प्रोसेसने सहज करा बदल

‘ब्रह्मास्त्र’च्या रिलीजची चित्रपट रसिकांना मोठी आतुरता आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन आक्खीनेनी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट तीन भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. यावर्षी चित्रपटाचा पहिला भाग पाहायला मिळणार आहे. यंदा 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान निर्मात्यांनी या चित्रपटातील अमिताभ यांचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. आणि त्यांच्या व्यक्तिरेखेची ओळख ‘गुरु’ अशी केली आहे. त्यांचा हा लुक पाहून चाहते फारच उत्सुक झाले आहेत.

Realme चा 5G स्मार्टफोन अवघ्या 500 रुपयात! कसं ते जाणून घ्या

अयान मुखर्जीने ‘प्रभास्त्र: द स्वॉर्ड ऑफ लाइट’ धारण करु शकणारा व्यक्ती म्हणून बिग बींच्या व्यक्तिरेखेचं ​​वर्णन केलं आहे. फर्स्ट लुकमध्ये बिग बी ‘द स्वॉर्ड ऑफ लाइट’ हातात धरलेले दिसत आहेत. त्यांचा चेहरा जखमांनी भरलेला दिसून येत आहे. अयानने पोस्टर शेअर करत ‘गुरु आणि त्यांचे प्रभास्त्र – द स्वॉर्ड ऑफ लाईट’असं अनोखं कॅप्शन लिहिलं आहे.त्याने पुढे लिहिलंय, ‘मी 2016 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’वर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना भेटलो. या चित्रपटाची संकल्पना आपल्याला आवडली असल्याचं त्यांनी नेहमीच सांगितलं आहे. प्राचीन भारतीय अध्यात्म आणि आधुनिक भारत यांच्या या समन्वयाने त्यांना खरोखरच आकर्षित केलं आहे’.

तुमचा CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन, फक्त ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Comments are closed.