Take a fresh look at your lifestyle.

‘5G’ सेवा लाँच झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेचा शुभारंभ केला असून अनेक जणांना या सेवेची प्रतीक्षा होती. देशभरातील काही निवडक शहरात सध्या ही सेवा सुरु झाली असून लवकरच याचे जाळे देशभरात विस्तारणार आहे. 5G सेवेचा शुभारंभ होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या सेवेच्या शुभारंभाने देशात एक नवी क्रांती घडणार असून, सध्या राज्यातील मुंबई, पुणे व पनवेल इथे सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.

ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल २१ दिवस सुट्ट्या; सणासुदीच्या काळात शेअर बाजार ३ दिवस बंद राहणार

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 5G सेवेमुळे इंटरनेट ची गती वाढल्याने शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास मदत होईल शिवाय सिस्टम अपडेट व अपग्रेड करण्यासाठी वेगवान इंटरनेटद्वारे मदत मिळणार आहे. सर्वात जास्त ऑनलाईन सेवांकरिता या वेगवान सेवेचा फायदा होणार असून, यामुळे आपला देश विकासाकडे जात असून यामध्ये या सेवेचा महत्वपूर्ण वाटा राहणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ९० दिवसांत मुंबईचा कायापालट करण्याचा निर्धार; विकासकार्यांना गती देणार

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा मोठा सहभाग आहे त्यामुळे कृषी, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण तसेच पायाभूत सुविधेवर लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील शेवटी बोलताना शिंदे यांनी नमूद केले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.