Take a fresh look at your lifestyle.

विनोद कांबळीनंतर ‘या’ खेळाडूसाठी धावून आले संदीप थोरात; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत होऊ शकणार सहभागी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : आर्थिक अडचणीत असलेल्या विनोद कांबळींना एक लाख रुपयांची नोकरी देणारे महाराष्ट्रातील युवा उद्योजक संदीप थोरात पुन्हा एकदा एका खेळाडूसाठी धावून आले आहेत. सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लि. आणि ऑन धिस टाईम मीडियाचे चेअरमन संदीप थोरात यांच्या मदतीमुळे एका प्रतिभावंत खेळाडूचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

घोषाली सारस असे या खेळाडूचे नाव आहे. ८ वर्षीय घोषाली किक बॉक्सर असून थोरातांच्या मदतीमुळे ती आता नवी दिल्ली येथे होणाऱ्या वाको इंडिया इंटरनॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ७, ८ आणि ९ वर्षे वयोगटात सहभागी होऊ शकणार आहे. मुळची अहमदनगर ची घोषाली तिसऱ्या वर्गात आहे. खेळात तिला प्रचंड आवड असून तिला पुढेही खेळातच करियर करायचे असल्याचे ती सांगते. घोषालीने यापूर्वी अहमदनगर जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्य पदक आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे.

महाराष्ट्र कुठे चालला आहे, उद्धव ठाकरेंनी याचे चिंतन करावे : देवेंद्र फडणवीस

प्रतिभावंत खेळाडू असलेल्या घोषालीला प्रत्येक स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी गृहिणी असलेली तिची आई ममता आणि खासगी कंपनीत कार्यरत वडिल विष्णू सारस हे सतत धडपड करत असतात. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने मुलगी घोषाली स्पर्धेला मुकणार अशी शक्यता निर्माण झाली होती.

सारस दाम्पत्याची धडपड आणि घोषालीच्या कामगीरीची माहिती मिळताच सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लि. आणि ऑन धिस टाईम मीडियाचे चेअरमन संदीप थोरात यांनी लगेच त्यांना अहमदनगर येथील कार्यालयात बोलावले आणि घोषालीला तिच्या स्पर्धेसाठी आवश्यक रक्कमेचा धनादेश सुपूर्द केला.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; पगारात होणार मोठी वाढ तर,…

लहानपणापासून घोषाली प्रत्येक खेळात रुची दाखवित असल्याने तिला किक बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात तिने आपल्या प्रतिभेच्या जोरावर उल्लेखनीय कामगीरी करून आमची मान उंचावली. मात्र तिच्या या यशात आमची परिस्थिती आड येऊ नये नेहमी वाटत होते आणि नेमकं तेच झाले. दिल्ली येथील आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठा खर्च आहे आणि आम्हाला तो न झेपणारा आहे.

आमच्या या परिस्थितीची माहिती मिळताच संदीप थोरात यांनी आम्हाला बोलावून धनादेश दिला. आमच्या मुलीच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ही खूप मोठी मदत आहे. संदीप थोरात यांच्या मदतीमुळे डोळे पाणावले आहेत. आज केवळ त्यांच्यामुळे घोषाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे, अशी भावना घोषालीची आई ममता सारस यांनी ऑन धिस टाईम मीडियाकडे व्यक्त केली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.