Take a fresh look at your lifestyle.

Agnipath Scheme : 4 वर्षानंतर काय करणार अग्निवीर? गृहमंत्रालयाचा मास्टर प्लॅन तयार

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – देशभरातीस सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध (Agnipath Scheme Protest) होत आहे. देशभरातील तरूण या योजनेच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारची ही योजना 4 वर्षांचीच असून त्यानंतर रोजगाराची संधी काय? असा या तरूणांचा आक्षेप आहे. देशभरातून हिंसक विरोध होत असूनही सरकार अंमलबजावणी करण्यावर ठाम आहे. याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच येणार आहे. त्याचबरोबर 4 वर्षानंतर हे तरूण काय करणार याचा प्लॅन केंद्रीय गृहमंत्रालयानं तयार केला आहे.

स्प्लेंडर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Maruti WagonR; ही भन्नाट ऑफर एकदा पाहाच!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. अग्निवीरांसाठी (Agniveers) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्समधील (Assam Rifels) भरतीमध्ये 10 टक्के जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अग्निनीरांना या दोन्ही दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा 3 वर्ष अधिक सूट देण्यात येईल. तर पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्याद 5 वर्ष शिथिल असेल, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

झटपट पर्सनल लोन घेण्यासाठी पात्रता-अटी; व्याजदरासाठी कोणते घटक महत्त्वाचे ठरतात?

अग्निवीरांसाठी भरतीचे नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय थलसेना प्रमुख मनोज पांडे यांनी यापूर्वीच दिली आहे. ‘2022 मधील भरतीसाठी वयोमर्यादा 23 वर्ष करण्याचा सरकारचा निर्णय आम्हाला मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळातही जे भर्ती परीक्षेसाठी तयारी करत होते अशा तरूणांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

😎New Bajaj Pulsar चा नवीन लुक कंपनीकडून जारी, पाहा नव्या बाइकमध्ये काय आहे खास?

ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पुढील 2 दिवसांमध्ये http://joinindianarmy.nic.in नोटीफिकेशन जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर सेना भरतीबाबतचा विस्तृत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. डिसेंबर 2022 पूर्वी अग्नीविरांची पहिल्या बॅचचं प्रशिक्षण सुरू होईल.’ भारतीय सेनेत सहभागी होण्याची मोठी संधी यामधून प्राप्त झाली आहे, त्याचा फायदा घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

लष्करभरतीचा अग्निपथ कार्यक्रम कसा असेल? हे आहेत गैरसमज अन् वस्तुस्थिती

केंद्र सरकारने संतप्त तरुणांचा राग शांत करण्यासाठी भरतीच्या वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सवलत केवळ एक वेळसाठी असेल आणि त्यानंतर अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेनुसार भरती होईल. सध्या, नवीन अग्निपथ योजनेत भरतीसाठी सरकारने वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे निश्चित केली आहे. परंतु लवकरच सुरू होणाऱ्या तीन सेवांच्या पहिल्या भरतीमध्ये 23 वर्षांपर्यंतचे तरुणही अर्ज करू शकतील.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.