Take a fresh look at your lifestyle.

कर्जत : वक्फ बोर्डाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती

0
maher

गणेश जेवरे, ओटीटी न्यूज नेटवर्क

कर्जत – येथील पीर हजरत दावल मलिक देवस्थानच्या 102 एकर या वर्ग 3 जमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन केलेल्या नवीन व्यवस्थापकीय मंडळाला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी मान्यता दिली होती. आता या मान्यतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती ट्रस्टच्या ट्रष्टीचे वंशज सोहराब युसुफ शेख यांनी आज पत्रकारांना दिली.

यासंदर्भात बोलताना सोहराब शेख म्हणाले की, पीर हजरत दावल मलिक ट्रस्ट ही सर्वधर्मीय पब्लिक ट्रस्ट आहे. याला 22 जानेवारी 1953 रोजी धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे नोंदणी करून मान्यता मिळालेली आहे. असे असताना या सर्वधर्मीय पब्लिक ट्रस्टच्या विरोधात वक्त बोर्ड औरंगाबाद यांनी 19 जानेवारी 2019 रोजी ही सर्व सर्वधर्मीय ट्रस्टची जमीन वक्फ मिळकत म्हणून नोंद केली व सात फेब्रुवारी २०२२ रोजी व्यवस्थापक व व्यवस्थापन मंडळ यांची नेमणूक केली.

मात्र हे करताना सर्वधर्मीय पब्लिक ट्रस्ट यांचे वंशज व या गावातील सर्व ग्रामस्थ यांना विचारात घेतले नाही.
वक्‍फ बोर्डाच्या आदेशानुसार नवीन व्यवस्थापक व व्यवस्थापन मंडळाने सर्वधर्मीय पीर हजरत दावल मलिक ट्रस्टच्या मिळकतीचा बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर मिळकतीच्या जागेवर अनधिकृतपणे मज्जित उभारण्याचे काम चालू केले होते.

याप्रकरणी सोहराब युसुफ शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वक्‍फ बोर्डाच्या आदेशाला आव्हान देणारी रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 28 मार्च रोजी खंडपीठातील न्यायमूर्ती आर डी धनुका व न्यायमूर्ती एस जी मेहेर यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने वक्फ बोर्ड औरंगाबाद यांची 19-7-2019 ची नोंदणी, 7 फेब्रुवारी 2022 चे नवीन व्यवस्थापक व व्यवस्थापन मंडळाच्या स्थापनेच्या आदेशात स्थगिती दिली.

तसेच नवीन व्यवस्थापक व व्यवस्थापक मंडळाच्या कोणत्याही सदस्यास येथील श्री पीर हजरत दावल मलिक देवस्थानच्या 102 एकर या वर्ग 3 जमिनीत हस्ते शेप करण्यास व ताबा घेण्यास स्थगिती व मनाईचे अंतरिम आदेश दिले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.