Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही – बन्सीदादा डोके

0

गणेश जेवरे, ओटीटी न्यूज नेटवर्क

कर्जत – राज्यात आतापर्यंत सत्तेवर आलेले सर्व सरकार हे संधीसाधू आणि नाकर्ते निघाले, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही अशी घणाघाती टीका भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बन्सीदादा डोके यांनी केली. भारतीय मराठा महासंघ या संघटनेची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी निवडीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष बन्सी दादा डोके यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

या बैठकीचे आयोजन पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मधुकर दंडे पाटील यांनी केले होते. यावेळी श्रीगोंदा, जामखेड, कर्जत या तीनही तालुक्यांच्या तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, अश्या एकूण 17 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेची तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बन्सी दादा डोके म्हणाले की, लाखोंच्या संख्येने आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाने मोर्चे काढूनही केवळ सर्व राज्य सरकार हे संधिसाधू असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही असा आमचा आरोप आहे. मात्र अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी जे बलिदान दिले, ते व्यर्थ न जाऊ देता सर्व समाजाची एकजूट करून समाजातील युवकांना व युवतींना उद्योग-व्यवसायात कडे वळवून त्यामध्ये त्यांना संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य करून त्यांना उभा करण्याचे काम करण्यात येणार आहे.

भारतीय मराठा महासंघाची स्थापना 1980 साली अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे. आमची संघटना ही कोणतीही पक्षाचे राजकारण करणार नाही. ज्या पक्षीय नेत्यांना आमच्या सोबत काम करायचे आहे त्यांनी पक्षाची जोडे बाहेर ठेऊन मराठा समाजासाठी काम करण्यासाठी पुढे यावे.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष मधुकर दंडे पाटील म्हणाले की, आज राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर व प्रदेशाध्यक्ष बन्सी दादा डोके यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील सहकारी सोपान कदम यांच्या मदतीने कर्जत, श्रीगोंदा, जामखेड येथील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आगामी काळात गाव तिथे भारतीय मराठा महासंघ यांची शाखा उघडून सर्व समाजाला एकत्र करून समाजहिताचे काम करण्यात येणार आहे. माझी स्वतःची नियुक्ती 29 नोव्हेंबर या दिवशी केली. संपूर्ण आयुष्यात संघर्ष केल्यामुळे त्याची दखल घेत भारतीय मराठा महासंघ याचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांनी दखल घेत मला नगर दक्षिणची जबाबदारी दिली आहे. पुढील काळामध्ये समाजासाठी काम करणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत असेही दंडे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी नगर दक्षिणची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती खालीलप्रमाणे

कर्जत तालुका – तालुकाध्यक्ष किशोर अडसूळ, उपाध्यक्ष उत्तर वैभव पवार, उपाध्यक्ष दक्षिण रविंद्र नवले, शहराध्यक्ष सुरज कोरडे ,शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, शहराध्यक्ष महेश मस्के, कार्याध्यक्ष विठ्ठल गायकवाड.

श्रीगोंदा तालुका – जिल्हा उपाध्यक्ष अनंता पवार, तालुकाध्यक्ष संतोष जठार, उपाध्यक्ष वैभव शितोळे, शहराध्यक्ष भाऊसाहेब दांडेकर

जामखेड तालुका – तालुका अध्यक्ष उमेश मुळे ,उपाध्यक्ष उत्तर दिपक रसाळ ,उपाध्यक्ष दक्षिण महेश बहिर , शहराध्यक्ष गणेश पवार ,शहर उपाध्यक्ष सुमंत डोके.

या सर्वांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष बन्सी दादा डोके यांच्या हस्ते देण्यात आले. सर्व उपस्थितांचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष किशोर आडसूळ यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.