Take a fresh look at your lifestyle.

कर्जतमध्ये पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी

0

गणेश जेवरे, ओटीटी न्यूज नेटवर्क

कर्जत – कर्जतमध्ये पत्रकार व सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी केली. माझी वसुंधरा अभियान स्पर्धेमध्ये कर्जत नगरपंचायतने सहभाग घेतला आहे. या अनुषंगाने वसुंधरा पंधरवडा सुरू आहे. आज शहरामध्ये कर्जत तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने या अभियानाला मदत म्हणून पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करून पर्यावरण वाचवण्याचा एक आगळा वेगळा संदेश सर्व नागरिकांना दिला. या अभियानामध्ये शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले होते.

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त व घातक रंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र या रंगामुळे पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असून अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे या केमिकलयुक्त रंगापासून जनतेचे व खासकरून लहान मुलांचे, महिलांचे संरक्षण व्हावे यासाठी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

आज सकाळी पत्रकार संघाचे सर्व सदस्य शहरातील तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, आरोग्य विभागाचे कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समवेत रंगपंचमीचा सण साजरा केला.

यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, महिला व बालकल्याण विभागाचे श्री मिटकरी, मच्छिंद्र पाडळे, नायब तहसीलदार सुरेश वाकचौरे, यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक श्री मोरे, व सुरेश गावित तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड, मुकुंद पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले होते.

सर्वांनी एकमेकाला पर्यावरणाचे रक्षण करणारे रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. कर्जत तालुका पत्रकार संघाने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने कर्ज शहरांमध्ये आज विविध रंगांची उधळण करण्यात आली यामध्ये बाल गोपाळ विद्यार्थी-विद्यार्थिनी महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याचे दिसून आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.