Take a fresh look at your lifestyle.

नेवासा तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

0

गुरूप्रसाद देशपांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नेवासा – तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन प्रभाकर कोलते होते. यावेळी संघाचे संचालक स्व. बाळासाहेब उंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सभेच्या सुरूवातीलाच व्यवस्थापक अशोकराव पटारे यांनी अहवाल वाचन केले. तसेच व्हा. चेअरमन डॉ. महेशराजे देशमुख यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भैय्यासाहेब देशमुख, अशोकराव ढगे, मच्छिंद्र कडू, भिमराज गिते, अशोकराव नांगरे, अण्णासाहेब पटारे आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.

विशेष बाब म्हणजे या सभेत मागील २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाच्या अंदाजपत्रकाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
यावेळी बोलताना चेअरमन प्रभाकर कोलते म्हणाले की, खरेदी विक्री संघाला यापूर्वी अनेक अडचणींना सामना करावा लागलेला आहे.

नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व आता सर्वांच्या सहकार्याने संघाच्या कामकाजात प्रगती होत आहे. शेतक-यांना संघाच्या माध्यमातून बी-बियाणे व रासायनिक खते देण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान, या वार्षिक सभेला सर्व संचालकांसह सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.