Take a fresh look at your lifestyle.

‘…तर आज बाटलीतून मिळणारे पाणी भविष्यात डोळ्यातून पाणी आणेल’

0
maher

गुरूप्रसाद देशपांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नेवासे – पाण्याचा अतिवापर करणें पाप असून, त्याचा जपून वापर न केल्यास आज बाटलीतून मिळणारे पाणी भविष्यात डोळ्यातून पाणी आणेल असे प्रतिपादन नेवासा न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश बी.यु. चौधरी यांनी केले. नेवासा न्यायालयात राष्ट्रीय जल दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश न्या. एस.एम. तापकीरे होते. तर व्यासपीठावर दुसरे जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश जी.बी. जाधव, न्या. श्रीमती एस.डी. सोनी, न्या.ए.बी. निवारे, न्या. श्रीमती ए.एस. गुंजवटे, न्या.ए.ए. पाचारने, जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ए.बी.अंबाडे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.बी.बी. सातपुते, अँड.के.एच.वाखुरे, अॅड.पी.सी.नहार, अँड.जे.एन. शेख आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रास्ताविक अॅड.सौ.एस.एस.लवांडे यांनी केले. यावेळी अॅड.बी.बी. सातपुते, अॅड.के.एच. वाखुरे यांची पाण्याचे महत्व या विषयावर भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात बोलताना न्या. तापकीरे म्हणाले की, जल है तो जीवन है! पृथ्वी पेक्ष्या इतर ग्रहावर पाण्याचे दुर्भिक्ष आहे. हे ओळखून पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य रीतीने नियोजन व्हावे म्हणून सरकारने पाणी व्यवस्थपन कायदा २००५ आमलात आणला आहे, तर पाणी व्यवस्थापन आधी नियम २००६ केला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

न्या.चौधरी पुढे बोलतांना म्हणाले की, ड्रीप चा वापर जास्तीत जास्त व्हावा. जगराहाटी मध्ये पाण्यासारख्या विषयाला सन्मान मिळायचे राहून जाते. त्याचा विसर पडू देऊ नका. जल है तो कल है! हे विसरून चालणार नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. जे.एन.शेख यांनी केले तर आभार अॅड.पी.सी. नहार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.