Take a fresh look at your lifestyle.

वडगावपान सोसायटी निवडणुकीत थोरात गटाचेच वर्चस्व

0
maher

हरिभाऊ दिघे, ओटीटी न्यूज नेटवर्क

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या वडगावपान विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ग्राम विकास मंडळांने सर्वच्या सर्व १३ जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळविला असल्याची माहिती थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.

थोरात सहकारी कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीमध्ये १ जागा आधीच बिनविरोध झाली होती, तर १२ जागा मोठ्या फरकाने शेतकरी विकास मंडळाचे जिंकल्या. याकामी महेश मोरे, डॉ. दादाभाऊ थोरात, बाळासाहेब गायकवाड, अशोक थोरात, पंचायत समिती सदस्य बेबी थोरात, एन. टी. थोरात, अरुण गायकवाड, कुळधरण यांनी परिश्रम घेतले.

या निवडणूकीत सर्वसाधारण मतदार संघातून अशोक बाबुराव काशिद, नानासाहेब शांताराम कुळधरण, आबासाहेब मनोहर थोरात, दिलीप माधवराव थोरात, निलेश गोरक्षनाथ थोरात, रामनाथ विष्णु थोरात, शंकर धोंडीबा थोरात, शंकर मारुती थोरात हे विजयी झाले असून इतर मागास प्रवर्गातून राधाकिसन मुरलीधर गाडगे, महिला राखीव मतदार संघातून कमल रामनाथ काशिद, केशर पोपट थोरात, भटक्या विमुक्त मतदार संघातून भिकाजी बाळाजी शिरसाठ तर अनु – जाती जमाती मतदार संघातून रविंद्र सिताराम गायकवाड हे मोठ्या मताधिक्यांनी निवडूण आले आहे.

बाबा ओहोळ म्हणाले, हा विजय ऐतिहासिक आहे. सर्व सभासदांनी धनशक्तीला नाकारून गुणशक्तीवर विश्वास ठेवून मतदान केले. विरोधकांनी कायम खोटा प्रचार करून सभासदांना भुलवण्याचा प्रयत्न केला परंतु सभासदांनी त्यावर विश्वास न ठेवता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विचारावर आचरण करणार्‍यावर व सर्व समाजासाठी गाव बांधिलकीचे काम करणारे उमेदवार निवडून दिले आहे.

जरी काहींनी अभाषी प्रचाराला धरून विरोधात मत टाकले असतील तर त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शेतकरी ग्रामविकास मंडळाच्या विचारावर व गावच्या परंपरेसाठी सलोखा राखून पुन्हा ह्या विचारात सहभागी व्हावे. व्यक्तीदोषातून चार लोकांच्या समाधानासाठी चांगल्या विचारापासून दूर न जाता गाव बांधिलकी मध्ये सहभागी व्हावे. धर्म, जातीवर आधारित प्रचार बहुसंख्य लोकांना मान्य नाही हे पुन्हा या निवडणुकीत सिद्ध झाले. हीच खरी शिकवण आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्व. दत्ताजी मोरे, प्रताप मोरे यांच्या विचारावर कायमच लोकांनी विश्वास दाखवलेला आहे.

या निवडणुकीत युवक, जेष्ठ, नागरिक कार्यकर्ते यांनी मेहनत घेऊन हा विजय खेचून आणला. यावेळी बयजु थोरात, छोटू थोरात, संभाजी काशीद, संभाजी थोरात, मनोहर थोरात, एकनाथ थोरात, पुंजा थोरात, बाबासाहेब थोरात, पुंजाहरी थोरात, कैलास थोरात आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. विजयी उमेदवारांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, बाजीराव खेमनर, रणजितसिंह देशमुख यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.