Take a fresh look at your lifestyle.

सत्ताधारी चुकीचे असतील, तिथे आवाज उठवणार- अजित पवार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाराष्ट्रातल्या तब्बल ९२ नागरपरिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीचं आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

संघर्षाची तयारी ठेवा, पुन्हा एकदा लढायचंय’; उद्धव ठाकरेंचे माजी आमदारांना आदेश

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना यावेळी अजित पवार यांनी मार्गदर्शन करताना अनेक मुद्यांवर भाष्य केलं. आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून कशी येईल, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची आपली तयारी असायला हवी. आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढाव्यात तसेच जिथे आपली ताकद जास्त असेल तिथे कोणाचीही मदत न घेता जागा लढवावी, असे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. जिथे सत्ताधार चुकीचे असतील तिथे आवाज नक्कीच उठवू आणि जिथे योग्य असेल तिथे राजकारण करण्याची भूमिका घेणार नाही, असंही पवार म्हणाले.

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यांची भूमिका लवकरच मांडण्यात येईल. पण भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याची जिथे गरज असेल, तिथे तशी भूमिका घ्यायची.धिवेशन काळात पक्षाच्यावतीने विधानसभेत आक्रमक भूमिका मांडण्याचे काम निश्चितपणे होईल. जिथे सत्ताधारी चुकीचे असतील तिथे आवाज नक्कीच उठवू आणि जिथे योग्य असेल तिथे राजकारण करण्याची भूमिका घेणार नाही,अशी ग्वाही अजितदादांनी दिली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.