Take a fresh look at your lifestyle.

अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता; ‘या’ प्रकरणी ईडीकडून चौकशी होण्याचे संकेत

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे वृत्त आहे, कारण लवकरच ईडीकडून त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात गाजलेल्या २५ हजार कोटीच्या राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी मूळ तक्रारदाराने एका अर्जाद्वारे निषेध नोंदवत याप्रकरणी चौकशीची मागणी केली असल्याने हे प्रकरण ईडीकडे वर्ग केले जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

“जर एकहाती सत्ता मिळाली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र निर्माण करून दाखवेल” – राज ठाकरे

सदर प्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाला ठोस व विश्वासदाखल पुरावे न मिळाल्याने या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात होती. परंतु मूळ याचिकाकर्त्याने अजित पवार यांच्यासह ७६ संचालकांची झालेली चौकशी यावर बोट ठेवत निषेधात्मक अर्जाद्वारे पुन्हा सखोल चौकशीची मागणी केली आहे. खुद्द मूळ तक्रारकर्त्याने पुन्हा या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून ईडीच्या आजवरच्या कारवाईचा दाखला देत चौकशीची आर्थिक गुन्हे विभागाला मागणी केल्याने नव्याने हे प्रकरण प्रकाशझोतात येणार असल्याचे समजते.

भारतीय रोजगार क्षेत्राला गती मिळणार; आगामी ५ वर्षांत ४७५ अब्ज डॉलर परकीय गुंतवणूकीचे संकेत

याचिकाकर्त्याद्वारे चौकशीची मागणी करण्यात आलेले प्रकरण साखर कारखाना विक्री संबंधी व्यवहाराचे असून यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. सदर प्रकरणी क्लोजर अहवाल सादर करण्यात आला असला तरी अजित पवार तसेच शरद पवार देखील रडारवर असल्याचे वृत्त आहे. जर हे प्रकरण पुनश्च चौकशीकरिता म्हणून ईडीकडे देण्यात आले तर काही धागेदोरे मिळाल्यास अजित पवारांच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार आहे. इथे विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडीने सदर प्रकरणी चौकशी होण्यापूर्वीच क्लोजर अहवाल सादर केल्याने सरकारची या प्रकरणी भूमिका देखील संशयाच्या घेऱ्यात दिसून येते. त्यावेळी खुद्द अजित पवारच उपमुख्यमंत्री असल्याने व विनाचौकशी क्लोजर रिपोर्ट सादर झाल्याने ईडीकडे प्रकरण वळविल्यास, नवीन खुलासा केला जाऊ शकतो.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.