Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र कुठे चालला आहे, उद्धव ठाकरेंनी याचे चिंतन करावे : देवेंद्र फडणवीस

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

अकोला : अकोला येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या नातवावर भाष्य करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी : बंगळूर शहरात ओला, उबेर ऑटोसेवेला बंदी; अधिक प्रवास शुल्क आकारणीच्या तक्रारी प्राप्त

उद्धव ठाकरे यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचं पटत नाही, पण काही नियम पाळले पाहिजेत. तसेच, नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसला आहे. एवढा दीड वर्षांचा बच्चू आहे, रुद्रांश. त्याचा जन्म झाला आणि तुमचं अध:पतन सुरू झालं. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो का? असा सवाल करत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; पगारात होणार मोठी वाढ तर,…

याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. “ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षांच्या नातवाचे नाव घ्यावे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे, याचे चिंतन केले पाहिजे. खरं तर त्यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घेतले पाहिजे.” असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे. याबाबत उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.