Take a fresh look at your lifestyle.

ALERT! महाराष्ट्रातील तब्बल ‘इतक्या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – यावर्षी हवामानात कमालीचा बदल पाहायला मिळाला. नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झाल्याचं देखील पाहायला मिळालं. यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाची रेकॉर्डब्रेक तापमान नोंद झाली. संपूर्ण देशासह महाराष्ट्रातीळ काही भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असेल तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावेल अशी आशा आहे.

केंद्र सरकारची तपास यंत्रणा असलेल्या ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचं पुढे काय होते?

दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता(Weather update) भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात 19 ते 21 मे या कालावधीत उष्णतेची लाट (heat wave) अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा पुन्हा थैमान! उत्तर कोरियात दोन लाख जणांना संसर्ग

विशेष म्हणजे, नांदेड जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली, जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना पावसाने झोडपले, नांदेड शहरासह हदगाव, भोकर,अर्धापूर, हिमायतनगर यासह काही ठिकाणी पाऊस पडल्याने वातावरण थंड झाले आहे. मान्सून पूर्व पडलेल्या पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे.

आयुष्यात कधीही पैशांची कमी भासणार नाही; फक्त ‘या’ चुका टाळल्या पाहिजेत

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी 19 मे ते 21 मे दरम्यान विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार अकोला, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान वर्धा शहरात काल सर्वाधिक उष्ण तापमान ४५ अंश सेल्सिअस होते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दरवर्षीपेक्षा मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागात तसेच अंदमान समुद्र आणि बंगाल उपसागराच्या पूर्वेकडील काही भागात मान्सूनची वाटचाल सुरू आहे आहे.

Comments are closed.