Take a fresh look at your lifestyle.

Alert!सूर्य आग ओकणार, पुढच्या पाच दिवसात ‘या’ भागांमध्ये उष्णतेची लाट, तर याठिकाणी होणार अवकाळी पाऊस

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Alert सध्या देशासह राज्यातील हवामान चक्र बिघडल्याची चर्चा आहे. अचानकच, अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडतोय, तर कधी प्रचंड उकाडा नकोस होतोय. उन्हाळा म्हटला तर ऊन आलंच. पण आता जाणवणाऱ्या ऊनाच्या झळा या प्रचंड घातक आणि धोकादायक आहेत. या ऊन्हामुळे चक्कर येणं, तसेच उष्माघाताची (Heatstroke) जास्त भीती आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून आधीच त्याबाबतची माहिती दिली जात आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या पाच दिवसांमध्ये देशातील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचादेखील (Maharashtra) समावेश आहे.

IPL 2022 Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यासंदर्भात BCCI चा मोठा निर्णय

महाराष्ट्रात 25 ते 28 या चार दिवसांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिली आहे. ही लाट विशेषत: मध्य महाराष्ट्रात जाणवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. विदर्भात 26 ते 28 दरम्यान उष्णतेची लाट असणार आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड आणि ओदिशा राज्यातही उष्णतेची लाट असणार आहे.

महाराष्ट्र पाठोपाठ गुजरातवरही उष्णतेच्या लाटेचं संकट आहे. येत्या पाच दिवसात गुजरातमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. त्याला आजपासून सुरुवात झाली आहे. गुजरातमधील ऊन्हाळ्याची ही परिस्थिती 28 ते 29 एप्रिलपर्यंत असणार आहे. तर बिहारमध्ये 24 ते 26 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट असणार आहे.

तुमच्या आधार कार्डचा मोबाईल सिमसाठी गैरवापर होतोय का? आधारशी लिंक सर्व फोन नंबर घरबसल्या तपासा

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात येत्या 26 ते 28 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येणार आहे. तसेच पंजाब आणि दक्षिण हरियाणामध्ये 27 आणि 28 हे दोन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते.

महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढच्या पाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. “येत्या 5 दिवसात राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता. तसेच 2, 3 दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता. कृपया काळजी घ्या”, असं के सी होसाळीकर म्हणाले आहेत.

17 वर्षांची आई, 12 वर्षाचा बाप; बनले नवजात बाळाचे पालक, काय आहे नेमकी घटना

Leave A Reply

Your email address will not be published.