Take a fresh look at your lifestyle.

हवामान खात्याचा अलर्ट; उद्यापासून ‘या’ जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढणार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : बंगलाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाची तीव्रता कमी होताच. महाराष्ट्रासह वायव्य आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रासह आसपासच्या प्रदेशात किमान आणि कमाल तापमानाचा पारा (temperature ) वाढतचं चालला आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात (Bay of bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे (Low pressure ) राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.

उष्णतेचा पारा चढाच राहणार
बुधवारी 30 मार्च रोजी हवामान खात्याने अहमदनगरसह औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला अमरावती आणि यवतमाळ या अकरा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 31 मार्च रोजी देखील राज्यात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. उर्वरती महाराष्ट्रात मात्र कोरडं हवामान राहणार असून उष्णतेचा पारा चढाच राहणार आहे. उर्वरित राज्यातील तापमान 33 ते 40 अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे.

पारा 42.3 अंश सेल्सिअसवर
उद्यापासून विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाची दाहकता वाढणार आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात काल सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. येथील तापमानाचा पारा 42.3 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला होता. त्यापाठोपाठ अमरावतीत 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास नोंदलं गेलं आहे. आजही कमी अधिक प्रमाणात राज्यात हीच स्थिती कायम आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.