Take a fresh look at your lifestyle.

खामगावचा भामटा पत्रकार श्रीधर ढगे पासून सावध रहा; लोकांना ब्लॅकमेल करून उकळतोय मोठी खंडणी

ओटीटी न्यूज नेटवर्क

खामगाव – (जि .बुलढाणा) येथील तोतया पत्रकार श्रीधर ढगे याच्यापासून सर्व व्यावसायिक मंडळींनी सावध राहावे. हा माणूस पत्रकार असल्याचे सांगतो. हा अगोदर पत्रकार होता, मात्र सध्या तो कोणत्याच मिडीयाला जॉईन नाही. त्याचं स्वतःचे पोर्टल आहे. त्या पोर्टलवर इतरांच्या नावाने खोट्या बातम्या पसरवून तो खंडणी जमा करतो. सध्या तो एक वेगळाच फंडा वापरत असून पैसे द्या नाहीतर मी तुमच्या बदनामीची बातमी पोर्टलवर लावेल अशाप्रकारे लोकांना ब्लकमेलिंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमची खूप प्रकरण माझ्याकडे आहेत, असं सांगून तो लोकांना पैशांसाठी ब्लॅकमेल करीत आहे.

हाच तो भामटा ब्लॅकमेलर श्रीधर ढगे

हाच श्रीधर ढगे ऑन धिस टाईम मीडिया मध्ये नागपूर कार्यालयात ब्यूरो चीफ म्हणून काम करत होता. मात्र या कार्यालयात त्याने जाहिरातीचे पैसे परस्पर खर्च केले. लोकांना पैशांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करायला सुरवात केली. विशेष म्हणजे यावेळी या भामट्याने ऑन धिस टाईमचे चेअरमन संदीप थोरात यांनाच ब्लॅकमेल केले आहे. २ लाख रुपये द्या अन्यथा मी तुमची बातमी लावेल, तुमची आणि कंपनीची बदनामी करेल अशी धमकी दिली. संदीप थोरात यांच्याकडून रक्कम न मिळाल्यामुळे त्याने ऑन धिस टाईम कडून होत असलेल्या पुरस्काराची बातमी लावली. हा पुरस्कार फसवा असल्याचे बातमी मध्ये नमूद केले. मात्र, वस्तुतः यामधे कोणतेही तथ्य नसून निव्वळ पैशांच्या हव्यासापोटी श्रीधर ढगेने हा प्रकार केला आहे.

उद्या दिनांक १० मे २०२२ रोजी अहमदनगर येथील पोलीस अधीक्षकांना भेटून श्रीधर ढगे विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र खामगाव, शेगाव, बुलढाणा तसेच विदर्भातील सर्व व्यावसायिक आणि शासकीय अधिकारी यांनी श्रीधर ढगे या भामट्या तसेच तोतया पत्रकारापासून सावध राहावे. तसेच, हा भामटा कोणाला ब्लॅकमेल करत असल्यास आमच्याशी संपर्क करावा.

ऑन धिस टाईम कडे महिलांच्या देखील तक्रारी
याचं श्रीधर ढगे chya बाबत महिलांच्या काही तक्रारी ऑन धिस टाईम मीडिया कडे आल्या आहेत. या श्रीधर ढगेने त्यांच्यासोबत केलेली अश्लील चॅटिंग तसेच काही कॉल रेकॉर्डिंग हाती लागल्या आहेत. नागपूर, खामगाव, अहमदनगर येथून महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑन धिस टाईम मीडिया लवकरच या महिलांना न्याय मिळून देऊन भामट्या श्रीधर ढगेचा पर्दाफाश करणार आहे

Comments are closed.