Take a fresh look at your lifestyle.

अलर्ट! तुमचं सीमकार्डचं करू शकतं तुमचं बॅंक खातं रिकामं, जाणून घ्या सविस्तर

0

ऑन धिस टाइम मीडिया

नवी दिल्ली – डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात सध्या सायबर क्राइमच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फ्रॉन करणारे विविध मार्गाने सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. कधी बॅंक अधिकारी म्हणून ते लोकांना कॉल करतात. तर कधी लॉटरीच्या नावाने फसवणूक करतात. असाच एक प्रकार सीम कार्ड स्वॅपिंगचा आहे.

सीम कार्ड स्वॅपिंग असा एक फसवणुकीचा प्रकार आहे. जो युजर्सला कुठलाही थाग पत्ता न लागता केला जातो. या प्रकारापासून सर्वांनीच सावध राहिलं पाहिजे. आता हा सीम कार्ड स्वॅपिंग म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सीमकार्ड स्वॅपिंग म्हणजे मोबाइल सीम कार्ड बदलणं. या फ्रॉडमध्ये फ्रॉडस्टर्स मोबाइल सर्विस प्रोव्हाइडरच्या मदतीने सेम नंबरवर नवं सीम कार्ड घेतात. त्यानंतर मोबाइल नंबरवर आलेल्या OTP द्वारे तुमच्या बँक अकाउंटसंबंधी आणि इतर माहिती मिळवतात.

चोरटे फ्रॉड कसा करतात?

फ्रॉड करण्यासाठी चोरटे हे सोशल इंजिनियरिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संबधित व्यक्तीच्या बँक खात्याचे डिटेल्स आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर मिळवतात. त्यानंतर खरं सीम कार्ड ब्लॉक करण्यासाठी खोट्या आयडी प्रूफसह मोबाइल ऑपरेटरच्या रिटेल आउटलेटवर जातात आणि खरं सीम कार्ड ब्लॉक करतात.

त्यानंतर वेरिफिकेशन झाल्यानंतर ग्राहकाचं सीम कार्ड डिअॅक्टिवेट केलं जातं आणि नकली ग्राहकाचं नवं सीम कार्ड जारी केलं जातं. आता सायबर क्रिमिनल्स फिशिंग फ्रॉडद्वारे पीडित व्यक्तीच्या फसवणूक आणि व्यवहार करण्यासाठी नव्या सीम कार्डचा वापर करतात.

ग्राहकांनी काय करावं?

– असा प्रकार लक्षात आल्यास विशेषत: असा नंबर जो बँक खात्याशी लिंक असेल, तर लगेच मोबाइल ऑपरेटर आणि बँकतेही याबाबत चौकशी करा.

– ऑनलाइन बँक अकाउंट पासवर्ड्स लगेच बदला.

– दररोज SMS अलर्टसह ईमेल अलर्टही ऑन ठेवा. यामुळे तुमची माहिती इतरांकडे गेल्यास त्याबाबत अलर्ट केलं जाईल.

– बँक अकाउंट स्टेटमेंट वेळोवेळी चेक करा.

– फ्रॉड झाल्यास लगेच फोन बँकिंगशी संपर्क करा.

Leave A Reply

Your email address will not be published.