Take a fresh look at your lifestyle.

Alto CNG; व्वा! आता महागड्या पेट्रोलचं टेन्शन विसरा, केवळ ६०००० रुपयांत घरी आणा सीएनजी कार

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत देशात सीएनजी कार्सचा (CNG Cars) खप वाढला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे हैराण झालेले नागरिक सीएनजी कार्सकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक कार्सकडेदेखील मोठ्या संख्येने ग्राहक वळले आहेत, मात्र त्यासाठीचं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशात सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे सीएनजी कार्स उत्तम पर्याय ठरत आहेत.

Google वर ‘या’ 4 गोष्टी चुकूनही सर्च करु नका, तुमची छोटीशी चूक तुम्हाला तुरुंगात टाकू शकते

तुम्ही देखील सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बजेटमुळे थांबला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्‍ही तुम्‍हाला अल्‍टो सीएनजी बद्दल माहिती देणार आहोत. ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या वाहनांपैकी एक कार आहे. तुम्ही केवळ ६०,००० रुपये डाउन पेमेंट (Down Payment) करून ही कार घरी नेऊ शकता. यावर किती ईएमआय (EMI) भरावा लागेल, कार कशी आहे. तिचे फीचर्स याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आता ‘या’ कारणामुळे आघाडीत बिघाडी होणार? महाराष्ट्रात पुन्हा खंजीरचं राजकारण

अल्टो सीएनजीवरील ईएमआय ऑप्शन(Alto CNG EMI)

मारुती अल्टो सीएनजी कारची किंमत ५.०३ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. तुम्ही ६०,००० रुपये डाऊन पेमेंट करुन ही कार खरेदी केल्यास, तुमचा ५ वर्षांसाठीचा मासिक ईएमआय (EMI) 8 टक्के व्याजदराने ९,९९६ रुपये इतका असेल. या कारसाठी तुम्हाला १,०६,७९० रुपये अधिक मोजावे लागतील.

असनी चक्रीवादळाने बदलला मार्ग, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम, कुठे बरसणार पाऊस?

एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की, अल्टो सीएनजी कार ईएमआयवर घेताना किंवा इतर कोणतीही कार ईएमआयवर घेताना त्यावर उपलब्ध असलेले कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असतात. तुम्ही तुमच्या बँकिंग किंवा CIBIL स्कोरमध्ये निगेटिव्ह असाल तर बँक ईएमआय किंवा व्याजदरात बदल करु शकते.

कारचं इंजिन

या ५ सीटर हॅचबॅक कारमध्ये ७९६ सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे, जे ४७.३३ Bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकतं. भारतातील ही सर्वात स्वस्त सीएनजी कार ३१.५९ किलोमीटर प्रति किलो मायलेज देते. तर अल्टो ८०० कारचं पेट्रोल व्हेरिएंट २२.०५ किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते.

ड्राइविंग लायसन्स बनवण्याचे बदलले नियम… आता करावे लागणार ‘हे’ काम

कशी आहे मारुती अल्टो सीएनजी

मारुती सुझुकी अल्टो ८०० सीएनजी व्हेरिएंटवर बॉडी कलरचे बंपर्स, बॉडी कलर डोर हँडल, स्टीयरिंग व्हीलवर सिल्व्हर अॅक्सेंटसह ड्युअल-टोन इंटीरियर, हीटरसह एसी, पॉवर स्टीयरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो मिळतात. अल्टो एस-सीएनजी मॉडेलवरील सेफ्टी फीचर्समध्ये ड्रायव्हर-साइड एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS, स्पीड अलर्ट सिस्टम आणि ड्रायव्हर आणि ड्रायव्हरशेजारी बसणाऱ्या प्रवाशासाठी सीट बेल्ट रिमाइंडर यांचा समावेश आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.